कोल्हापूर

प्रिशा शिंदे, सहिता, पापरकर उपांत्य फेरीत

CD

रमेश देसाई स्मृती टेनिस स्पर्धा
००००००००००००००००००

प्रिशा शिंदे, सहिता, पापरकर उपांत्य फेरीत
---
महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव-सोनकुसरे जोडीचा धडाका कायम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : राज्य लॉन टेनिस संघटना व जिल्हा टेनिस संघटनेतर्फे आयोजित १८ व्या रमेश देसाई स्मृती १६ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात कर्नाटकच्या साई जान्हवी टी व महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदे यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारली.
टेनिस कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरी मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित समर्थ सहिताने गुजरातच्या दहाव्या मानांकित पंशुल उबोवेजाचा, तर अर्णव पापरकरने कर्नाटकच्या श्रीनिकेत कन्नन याचा एकतर्फी लढतीत पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकच्या दुसऱ्या मानांकित आराध्या क्षितिजने उत्तराखंडच्या नवव्या मानांकित अर्णव यादवचा पराभव केला. मुलींच्या गटात कर्नाटकच्या बिगर मानांकित साई जान्हवी टी हिने दिल्लीच्या पाचव्या मानांकित याशिका शोकीनचा, तर महाराष्ट्राच्या बिगर मानांकित प्रिशा शिंदेने उत्कृष्ट खेळ करीत सहकारी सहाव्या मानांकित कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली.
दुहेरीत मुलांच्या गटात दिल्लीच्या प्रणील शर्माने हरियानाच्या आदित्य मोरच्या साथीत उत्तराखंडच्या अर्णव यादव व हरियानाच्या अर्जुन राठी या दुसऱ्या मानांकित जोडीचा, तर कर्नाटकच्या आराध्या क्षितिज व श्रीनिकेत कन्नन या बिगर मानांकित जोडीने तमिळनाडूच्या व्ही. थिरुमुरुगन व कर्नाटकच्या श्रीकर डोनी या चौथ्या मानांकित जोडीचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या आकृती सोनकुसरे व ऐश्वर्या जाधव (महाराष्ट्र) या अव्वल मानांकित जोडीने महाराष्ट्राच्या देवांशी प्रभुदेसाई व गुजरातच्या जान्हवी आसावा यांचा, तर महाराष्ट्राच्या नानिका बेंद्रम व सेजल भुतडा या दुसऱ्या मानांकित जोडीने तेलंगणाच्या वेनेला रेड्डी गारुगुपती व मध्य प्रदेशच्या पहेल खराडकर यांचा पराभव केला. ओडिशाच्या सोहिनी मोहंतीने कर्नाटकच्या हरिशिनी एन. हिच्या साथीत तमिळनाडूच्या सविता भुवनेश्वरन व दिया रमेश या चौथ्या मानांकित जोडीचा एकतर्फी लढतीत पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली.

निकाल असा : एकेरी उपांत्यपूर्व फेरी ः प्रणील शर्मा (दिल्ली) वि. वि. गंधर्व कोठापल्ली (कर्नाटक), समर्थ सहिता (महाराष्ट्र) वि. वि. पंशुल उबोवेजा (गुजरात), अर्णव पापरकर (महाराष्ट्र) वि. वि. श्रीनिकेत कन्नन (कर्नाटक), आराध्य क्षितिज (कर्नाटक) वि. वि. अर्णव यादव (उत्तराखंड). मुली- साई जान्हवी टी. (कर्नाटक) वि. वि. याशिका शोकीन (दिल्ली), प्रिशा शिंदे (महाराष्ट्र) वि. वि ऐश्वर्या जाधव (महाराष्ट्र), दिव्या उंग्रीश (दिल्ली) वि. वि. नैनिका रेड्डी बेंद्रम (महाराष्ट्र), ऋषिता बसिरेड्डी (तेलंगणा) वि. वि. आकांक्षा घोष (पश्चिम बंगाल).
दुहेरी- कबीर चोठानी (गुजरात)/ समर्थ साहित्य (महाराष्ट्र) वि. वि. शौर्य भारद्वाज (उत्तर प्रदेश)/ शिवतेज शिरफुले (महाराष्ट्र), प्रणील शर्मा (दिल्ली)/आदित्य मोर(हरियाना) वि. वि. अर्णव यादव (उत्तराखंड)/अर्जुन राठी (हरियाना), आराध्य क्षितिज (कर्नाटक)/ श्रीनिकेत कन्नन(कर्नाटक) वि. वि. व्ही. थिरुमुरुगन (तमिळनाडू)/ श्रीकर डोनी (कर्नाटक), धीरज रेड्डी व्ही. (तेलंगणा)/ राहुल लोकेश (तेलंगणा) वि. वि. गंधर्व कोठापल्ली (कर्नाटक)/ श्रीनिवास कुरापती (आंध्र प्रदेश).

मुली ः आकृती सोनकुसरे/ ऐश्वर्या जाधव(महाराष्ट्र) वि. वि. देवांशी प्रभुदेसाई (महाराष्ट्र)/जान्हवी आसावा (गुजरात), नानिका बेंद्रम (महाराष्ट्र)/ सेजल भुतडा (महाराष्ट्र) वि. वि. वेनेला रेड्डी गारुगुपती (तेलंगणा)/ पहेल खराडकर (मध्य प्रदेश), अरझान खोराकीवाला(कर्नाटक)/ यशिका शोकीन (दिल्ली) वि. वि. मंडगल्ला प्रिन्सी (तेलंगणा)/ दिव्या उंग्रीश (दिल्ली), सोहिनी मोहंती (ओडिशा)/ हरिशिनी एन. (कर्नाटक) वि. वि. सविता भुवनेश्वरन (तमिळनाडू)/ दिया रमेश (तमिळनाडू).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT