कोल्हापूर

अतिक्रमण अकिवाट टाकळी

CD

03379
अतिक्रमित गायरान शेतीक्षेत्र ताब्यात
सैनिक टाकळीत महसूलची कारवाई; पिके काढून घेण्याच्या सूचना
कुरुंदवाड ता. ३१ ः अकिवाट-सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील १९२ एकरांतील अतिक्रमित गायरान शेतीचे क्षेत्र महसूल विभागाने आज जेसीबीने चर मारून ताब्यात घेतले. यापैकी सुमारे ६५ एकर क्षेत्र ऊस , टोमॅटो आणि मिरचीच्या पिकाखाली आहे. चार दिवसात क्षेत्रातील अतिक्रमण हटविण्यात येईल.
अकिवाट येथील गटक्रमांक ९२६ मध्ये १३० एकर गायरान जमीन आहे. महसूल प्रशासनाने जमीन ताब्यात घेताना ५० एकर जमिनीवर ऊस पिकाचे अतिक्रमण दिसून आले. संबंधित शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाने पिके काढून घेण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. सध्या हे क्षेत्र खुले आहे.
आज (ता. ३१) सैनिक टाकळीतील गट क्र.१३५०,११९४ मधील ६५ एकर गायरान शेतीचे क्षेत्र तालुका नगर भूमापनचे अधिकारी ड्रोनद्वारे आणि अत्याधुनिक मोजणी यंत्राद्वारे मोजमाप करून त्यांनी हद्दी निश्चित करून दिल्या. यानंतर गायरान जमीन ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली. १५ एकर क्षेत्रावर ऊस आणि टोमॅटो पिके असून संबंधित शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाने पिके दोन दिवसात काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
सैनिक टाकळी हद्दीतील गायरान हद्द निश्चित करताना नगरभूमापन अधिकाऱ्यांनी नोटीस दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात आमचे क्षेत्र गायरान जमिनीत गेल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न शेतकरी ज्ञानदेव पाटील (बाबर) यांनी गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना केला. शासन वैयक्तिक शेतकऱ्याची एक इंचही जागा घेणार नाही. शेतकऱ्यांना शंका असल्यास त्यांनी मोजणीसाठी अर्ज करावा व शेताची मोजणी करून हद्दी निश्चित कराव्यात; असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT