कोल्हापूर

तळाशी येथे मूलग्याने बापावर केले कोयत्याचे वार

CD

दारूच्या नशेत मुलाकडून
पित्यावर कोयत्याने वार

तळाशीतील प्रकार; वडील गंभीर जखमी

कसबा वाळवे ता. २२ ः राधानगरी तालुक्यातील तळाशी येथे किरकोळ कारणावरून मुलाने दारूच्या नशेत आपल्या जन्मदात्या पित्यावरच प्राणघातक हल्ला केला. कोयत्याने सपासप वार केल्याने वृद्ध पिता गंभीर जखमी झाला. साताप्पा पिराजी चव्हाण (वय ६५, रा. तळाशी) असे त्यांचे नाव आहे. संशयित हल्लेखोर मुलगा सुनील साताप्पा चव्हाण (वय ३०) याला राधानगरी पालिसांनी अटक केली आहे.
ही घटना सोमवारी (ता. २२) दुपारी दीड वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. जखमी साताप्पा यांना तातडीने रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुनील चव्हाण हा सेट्रिंग कामगार आहे. त्याला दोन मुली आहेत. त्याच्या दुर्वा या लहान मुलीला चार दिवसांपासून जुलाबाचा त्रास होऊ लागला होता. आज दुपारी दीड वाजता साताप्पा चव्हाण यांनी आपल्या नातीला जुलाब कमी होण्याच्या औषधाच्या गोळ्या दिल्यास काय, अशी विचारणा आपला मुलगा सुनीलकडे केली. यावेळी दारूच्या नशेत असणाऱ्या सुनीलने वडिलांशी वादावादी केली. त्यावेळी तेथे सुनीलची पत्नी सुनीता होती. तिने दोघांतील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला; पण त्याचवेळी संतप्त झालेल्या सुनीलने धारदार कोयत्याने जन्मदात्या पित्यावर प्राणघातक हल्ला केला. कोयत्याचा वर्मी घाव डोक्यात लागल्याने साताप्पा चव्हाण हे घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. हल्लेखोर सुनीलची पत्नी सुनीता व गावकऱ्यांनी जखमीला तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डोक्यातील अतिरक्तस्त्रावामुळे साताप्पा चव्हाण यांची प्रकृती गंभीर बनली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुलगा सुनील साताप्पा चव्हाण याला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT