कोल्हापूर

पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची जबाबदारी महत्त्वाची

CD

01313
महागाव ः येथे महात्मा फुले विद्यालयात वनपाल एस. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा. पी. डी. पाटील, आशोक नांदूलकर, प्रकाश देवडकर, रुबिना सोलापूरे आदी उपस्थित होते.
------------
पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांची जबाबदारी महत्त्वाची
वनपाल पाटील; महात्मा फुले विद्यालयात सामाजिक वनीकरण विभागामार्फत व्याख्यान
महागाव, ता. २९ : देशाच्या जडणघडणीत पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे. देशात ३४ टक्के क्षेत्र जंगल असणे गरजेचे आहे. पण ते आज २८ टक्के क्षेत्र आहे. अजून चार टक्के क्षेत्र वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांची पर्यावरण रक्षणात जबाबदारी खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल एस. एस. पाटील यांनी केले.
ते महागाव येथील महात्मा फुले विद्यालयात आयोजित हरित सेना विभागातर्फे जागतिक वन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय. एस. पाटील तर वनसेवक प्रकाश देवडकर, प्रा. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सीडबॉल तयार केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवले. प्रा. पी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना वनसंपदा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
पर्यवेक्षक अशोक नांदुलकर, रुबिना सोलापुरे, संजय पाटील, शौकत नांगनुरे, भीमराव भुईंबर, किरण पाटील, रमेश कळविकट्टे, कुलदिप देसाई, एकता पाटील, सुवर्णा शेवाळे, शिवाजी सुतार, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. आभार सुभाष सुतार यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT