प्राथमिक शिक्षक बँकेस
भोसले यांचे नाव द्या
म्हाकवे, ता. १ : कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेस बँकेचे संस्थापक व बस्तवडेचे सुपुत्र कर्मवीर रावबहाद्दूर डी. आर. भोसले यांचे नाव द्यावे, अशी मागणी बस्तवडे ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर संस्थानचे शाहूकालीन एज्युकेशन प्रोसिडिंग ऑफिसर म्हणून भोसले कार्यरत होते. त्या काळात त्यांनी प्राथमिक शिक्षण विभागात आमूलाग्र कार्य केले. तसेच नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या स्थापनेत सहभाग घेतला. आज या शिक्षण संस्थेच्या ४७७ शाखा आहेत. त्याचप्रमाणे १९३९ मध्ये प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना केली. प्राथमिक शिक्षकांच्या जीवनात मोलाचे योगदान दिले आहे. बँकेने कोल्हापुरातील मुख्य कार्यालयाच्या दारात भोसले यांचा पुतळा उभारला आहे. बँकेला संस्थापक डी. आर. भोसले यांचे नाव द्यावे, अशी मागणी बस्तवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले, सागर कांबळे, शिवाजी पाटील, नामदेव चौगुले यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.