कोल्हापूर

सकाळ इम्पॅक्ट कोतोली फाटा ते नांदारी मार्गावर बॅरिकेटस् लावले

CD

02964

सकाळ इम्पॅक्ट

कोतोली फाटा ते नांदारी
मार्गावर बॅरिकेटस् लावले

माजगाव ता. १६ : कोल्हापूर ते पाचलला मार्गावरील कोतोली फाटा ते नांदारीपर्यंत २८ किलोमीटरचे काम गतीने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने खोदाई केलेला मार्ग दर्शविण्यासाठी रिफ्लेक्टर अगर बॅरिकेट लावले नव्हते. खडीची पोती ठेऊन ठेकेदारांनी जबाबदारी झटकली होती. वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला होता. या संदर्भात दै. ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेऊन ठेकेदारांने सुरक्षिततेसाठी बॅरिकेटस् लावले आहेत. वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ामार्गासाठी आमदार डाॅ.विनय कोरे यांच्या प्रयत्नातून ए.डी.बी योजनेतून २०५ कोटीचा निधी मंजूर झाला. कोतोली फाटा ते नांदारीपर्यंत रस्त्याची बाजूपट्टी पाच फुटाच्या मापाने खोलवर खोदली आहे. रस्त्याशेजारून पर्यायी मार्ग सुरू ठेवला आहे. खोदाई केलेला मार्ग दर्शविण्यासाठी खडीची पोती ठेवली होती. रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार चरीत पडून जायबंदी झाल्याच्या घटना घडत होत्या. पर्यायी रस्त्याचा मार्ग बदललेल्या ठिकाणी रस्ता बंद करून रिफ्लेक्टर लावण्याची नितांत गरज होती. काही ठिकाणी कापडी पट्टया बांधल्या आहेत. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ठेकेदाराने दिशादर्शनासाठी बॅरिकेटस् लावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT