कोल्हापूर

कऱ्हाड शरदपवार कार्यक्रम

CD

28708
कऱ्हाड : एसजीएम महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन करताना शरद पवार. शेजारी श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. अनिल पाटील, डॉ. भगिरथ शिंदे, प्राचार्य मोहन राजमाने, रवींद्र पवार, शशिकांत शिंदे आदी.

रयतमध्ये ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम

शरद पवार : जूनपासून सुरू, दोन हजार विद्यार्थ्यांना फायदा

कऱ्हाड, ता. ५ : रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होणार आहेत. येत्या जूनपासून रयतच्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासह त्याच्या विस्ताराकडे रयतने विशेष लक्ष दिल्याने जागतिक पातळीवरही रयतची मोहर उमटली जाणार आहे, असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
येथील एसजीएम महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीचे उद्‌घाटन व इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अनिल पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, अॅड. रवींद्र पवार, डॉ. भगीरथ शिंदे, प्रभाकर देशमुख, राजेंद्र फाळके, सुभाष शिंदे, एम. बी. शेख, संजीव पाटील, राजकुमार पाटील, प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.
काही ठराविकांकडे असलेली शिक्षणाची मक्तेदारी कर्मवीर अण्णांमुळे सर्वव्यापी झाली, असे सांगून श्री. पवार म्हणाले, ‘काळाची पावले ओळखून बदल केले पाहिजेत. कर्मवीर अण्णांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. धान्य पैसा रयतेच्या नावाने उभा केला. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यास हातभार लागला. शून्यातून निर्माण केलेले रयतचे विश्व सर्वव्यापी होऊ पाहात आहे. आज रयतमध्ये परदेशी मुले शिकायला येतात. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही म्हणून व्यावसायिक शिक्षणाकडे वळले पाहिजे. जगात ऑक्सफर्ड विद्यापीठ सर्वश्रेष्ठ आहे. तेथे प्रशिक्षणासाठी संस्थेतील निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवणार आहोत. आयबीएम कंपनीसोबत रयतने करार केला आहे. ती ११७ देशांत काम करते. त्यामध्ये ४० लाख लोक काम करत आहेत. जूनमध्ये आयबीएमचा कोर्स महाविद्यालयात सुरू करणार आहोत. तो कोर्स करणाऱ्या ८४ टक्के लोकांना नोकरी देण्याचे मान्य केले आहे. नोकरीसाठी देश-विदेशात जावे लागेल, ही काळाची पावले ओळखून आपण जगायला शिकले पाहिजे. त्यामुळे रयत सर्वव्यापी होत आहे, याचा आनंद होतो आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT