कोल्हापूर

पोलिस भरतीसाठी धरणग्रस्‍ताचे बनावट प्रमाणपत्र

CD

पोलिस भरतीसाठी जोडले
धरणग्रस्‍ताचे बनावट प्रमाणपत्र
छाननीत उघड; राहुरी येथील युवकासह साथीदारावर गुन्‍हा
सातारा, ता. २० : सातारा पोलिस दलांतर्गत आयोजित भरती अर्जासोबत धरणग्रस्‍त असल्‍याचे बनावट प्रमाणपत्र जोडल्‍याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात विनोद गोरक्षनाथ मोरे (वय २७, रा. मोरेवाडी-वांबोरी, ता. राहुरी, जि. नगर) याच्‍यासह त्‍याच्‍या साथीदारावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.
सातारा पोलिस दलाने नोव्‍हेंबर ते डिसेंबर या कालावधीत भरती प्रक्रिया घेतली. त्यातील अर्जांसह कागदपत्रांची छाननी पोलिस अधीक्षक कार्यालयात झाली. छाननीदरम्‍यान मोरे याने जोडलेले धरणग्रस्‍त असल्‍याचे प्रमाणपत्र बनावट असल्‍याचे समोर आले. ते प्रमाणपत्र त्‍याने साथीदाराच्‍या मदतीने तयार करत शासनाची फसवणूक केल्‍याचे समोर आले. याबाबतची तक्रार जिल्‍हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय तुकाराम पाटील यांनी दिली. उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.
अहवालानंतर बनावटगिरी उघड
सातारा येथील भरतीमध्ये ७ जागा धरणग्रस्‍त तसेच भूकंपग्रस्‍तांसाठी राखीव होत्‍या. या कोट्यातून अर्ज केलेल्‍या उमेदवारांनी सोबत जोडलेल्‍या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्‍यात आली. विनोद मोरे याने बीड येथील धरणग्रस्‍त असल्‍याचे प्रमाणपत्र जोडल्‍याची शहानिशा करण्‍यासाठी एक पथक बीड जिल्‍हाधिकारी कार्यालयात गेले होते. या ठिकाणी झालेल्‍या पडताळणीत ते प्रमाणपत्र दुसऱ्याच व्‍यक्‍तीला देण्‍यात आल्‍याचे समोर आले. तसा अहवाल बीड येथील उपजिल्‍हाधिकारी डॉ. दयानंद जगताप यांनी दिला. यानुसार हा गुन्‍हा सातारा येथे नोंदविण्‍यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT