कोल्हापूर

पतंजली

CD

पतंजलीचा प्रति समभाग
सहा रुपये लाभांश जाहीर

पुणे, ता. २ : मागील आर्थिक वर्षात ‘पतंजली फूड्स लिमिटेड’ने (पीएफएल) दमदार व्यवसाय करीत यंदाचा वार्षिक निकाल घोषित केला. गेल्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने प्रती समभाग सहा रुपये लाभांशाची शिफारस केली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण उत्पन्न ३१ हजार ८२१ कोटी इतके झाले आहे. त्याआधी ते २४ हजार २८४ कोटी रुपये होते. ‘पीबीटी मार्जिन''मध्ये यंदा ९.७ टक्क्यांनी वाढ होऊन ती ११७८ कोटी झाली. गेल्यावर्षी ती मार्जिन १,०७४ कोटी रुपये होती. कंपनीने ३३ देशांमध्ये उत्पादने निर्यात करून ५३० कोटी ८० लाख रुपयांची रुपयांची उलाढाल केली. आंतरराष्ट्रीय बाजारात भौगोलिकदृष्ट्या विस्तार करण्याचे आपले ध्येय कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने पामतेलाच्या व्यवसायात गेल्या वर्षीपेक्षा २१ टक्के वाढ करीत २५ हजार ६३४ कोटी रुपयांचा महसूल मिळविला. पामतेलाच्या वाढत्या लागवडीमुळे कंपनीने आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम या राज्यांच्या सरकारशी सामंजस्य करार केले.
‘एनसीएलटी’ने मंजूर केलेल्या रिझोल्यूशन प्लॅनची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यानंतर कंपनीने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सातत्याने तिसऱ्या वर्षी चांगली आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. जलद हस्तांतर ग्राहकोपयोगी वस्तूंचे (एफएमसीजी) उत्पादन करण्यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीने सहा उत्पादने आणि १८ नवी गोदामे निर्माण केली आहेत. स्पोर्ट्स न्यूट्रिशनसारखी उत्पादने पुन्हा लाँच केली आहेत. गाईचे तूप, मध, च्यवनप्राश, मसाले, आवळा-कोरफड यांसारखे औषधी रस व फळांचे रस, पीठे आदी प्रमुख खाद्य उत्पादने असलेला पतंजली हा एक प्रसिद्ध घरगुती ब्रँड झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT