वडगावमध्ये १३ मार्चला निवड चाचणी
पेठवडगाव, ता. २२ : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने लेदर बॉल क्रिकेटला ग्रामीण भागात चालना देण्यासाठी तालुकास्तरावरील १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. जे खेळाडू ग्रामीण भागातील आहेत व त्यांनी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये कोणत्याही संघामार्फत नोंद केलेली नाही, अशा खेळाडूंची प्रत्येक तालुक्यात निवड चाचणी घेण्यात येईल. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल.
हातकणंगले तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे १६ वर्षांखालील संघाची निवड चाचणी १३ मार्चला मौजे तासगाव रोडवरील आरपीसीए रहिवासी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सकाळी नऊला घेण्यात येईल. १ सप्टेंबर २००७ नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी निवड चाचणीत भाग घ्यायचा आहे. निवड चाचणीतून निवडण्यात येणारा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत हातकणंगले तालुक्याचे प्रतिनिधित्व करेल. ज्यांना निवड चाचणीत भाग घ्यायचा आहे, त्यांनी नावाची नोंद हातकणंगले तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. इम्रान पटेल यांच्याशी संपर्क साधावा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.