कोल्हापूर

राजकुमार पोळ यांचा सत्कार

CD

राजकुमार पोळ
यांचा सत्कार
पेठवडगाव, ता. ३ : सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल येत आहेत. स्पर्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत संस्थेची प्रगती करण्याचे मोठे आव्हान राजकुमार पोळ यांनी पेलले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल सामाजाने घेतली. परंतु एवढ्यावर त्यांनी न थांबता संस्थेच्या प्रगतीसाठी आणखी काम करुन संस्था शिखरावर नेण्याचे काम करावे, असे प्रतिपादन माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले.
येथील जयभवानी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर राजकुमार पोळ यांना हातकणंगले पतसंस्था कर्मचारी संघटनेच्यावतीने आदर्श जनरल मॅनेजर पुरस्कार
मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, श्रीमती विजयादेवी यादव, संस्थेचे माजी अध्यक्ष सुनिल हुक्केरी, संस्थेचे अध्यक्ष विलास सणगर, गुरुप्रसाद यादव, रणजीतसिंह यादव उपस्थित होते.
हातकणंगले तालुका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पोळ म्हणाले, ‘त्यांनी नेहमीच समाजातील गोरगरीब व गरजू घटकांना मदतीचा हात दिला आहे. जयभवानी पतसंस्थेच्या योगदानात पोळ यांचे कार्य उल्लेखनीय आहे. अजातशत्रू,विनयशिलता व सहकाऱ्यांकडून काम करुन घेण्याची कला याबाबींचा विचार करुन त्यांना पुरस्कार दिला.’ विजय शहा, सचिन चव्हाण, प्रसन्न चिंगळे, जगदीश लोळगे यांची भाषणे झाली. प्रशांत भोरे यांनी सुत्रसंचालन केले. शरद पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT