कोल्हापूर

कागल अपघात

CD

2691
मयत नवनाथ धनगर
....

तिहेरी अपघातात एकोंडीचा तरुण ठार

शाहू कारखाना फाट्यावर मिनी बसची मोटारीसह दुचाकीला धडक

सिद्धनेर्ली, ता.२१ ः कागल- निढोरी राज्यमार्गावर कागलजवळ शाहू साखर कारखाना फाटा येथे मिनी बसने मोटार आणि मोटारसायकलला समोरून दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. नवनाथ दत्तात्रय धनगर (वय २८, रा. एकोंडी, ता. कागल) असे मृताचे, तर आप्पाजी धुळाजी हजारे (१८, रा. सिद्धनेर्ली, ता. कागल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अपघात आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडला. याबाबतची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली असून, बसचालक राजेंद्र बबन खंडागळे (वय ५४, रा. कोरेगाव, जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आदमापूर येथे बाळूमामांचे दर्शन करून प्रवासी घेऊन भरधाव मिनी बस (एम एच११ टी ९४९७) कागलकडे जात होती. याच दरम्यान समोरून येणारी मोटार (एम एच ०५ बी एस ५९०९) सुद्धा आदमापूरकडे देवदर्शनासाठी जात होती. याचवेळी शाहू साखर कारखाना फाटा येथे बसने मोटारीला समोरून जोराची धडक दिली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या उलट्या दिशेने फिरली. तिने मोटारीच्या पाठीमागून आरेवाडी येथे देवदर्शन करून मोटारसायकलवरून (एम एच ०९ सी क्यू ६८०६) गावी परतणाऱ्या नवनाथ धनगर आणि आप्पाजी हजारे यांना जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, मोटारसायकलला शंभर फुटांवर फरफटत नेले आणि मोटारसायकल रस्त्याकडेच्या कठड्याला धडकली. यात नवनाथच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन तो जागीर ठार झाला, तर आप्पाजी गंभीर जखमी झाला. मृतदेह घरी आणताच नवनाथच्या पत्नी, मुले व नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नवनाथच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
.................

आजीच्या बाराव्या दिवशीच
नातवावर काळाचा घाला

नवनाथच्या आजीचे बारा दिवसांपूर्वी निधन झाले आहे. आजीच्या बाराव्या दिवशीच नातवावर काळाने घाला घातला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरी तसेच बकऱ्याच्या तळावरील होणाऱ्या गादी पूजन व लाखेच्या विधीची धनगर कुटुंबीयांकडून तयारी सुरू होती. अशातच ही दुर्दैवी घटना घडली.
..............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT