कोल्हापूर

कृषी पंपाच्या सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी मध्यरात्री काढला महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

CD

सिद्धनेर्लीत खंडित विजेवरून
महावितरण अधिकारी धारेवर

सिद्धनेर्ली, ता. ६ ः येथील शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठीच्या सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल शुक्रवारी मध्यरात्री येथे महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. संतप्त शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यानंतर महावितरणच्या स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री लाईनमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले.
परिसरातील शेतीसाठीचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. उन्हामुळे उसासह इतर पिके वाळत होती. मुळातच महावितरणच्या सलग तीन महिन्यांतील रात्रपाळीतील वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकावर शेतकरी नाराज होते. अनियमित व सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे सोशल मीडियावरील आवाहनानुसार शेतकरी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयात एकत्र झाले. या शेतकऱ्यांनी खंडित केलेल्या वीज पुरवठ्याची भरपाई करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र त्यांनी साफ नकार दिला. त्यानंतर विद्युत पुरवठ्यातील बिघाड काढून रात्री दोन वाजता वीजपुरवठा सुरळीत केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT