अस्वस्थ मनाच्या घुसळणीतून
कवितेचा जन्म ः दासू वैद्य
सरुड, ता. ६ ः ‘‘बीज जिवंत असतेच. फक्त त्यावर सुसंस्कार केले जातात. शेतकऱ्याजवळ उत्तम सर्जनशीलता असते. कवी हासुद्धा शब्दांची शेती करणारा शेतकरीच आहे. स्वयंपाकघर, सुगरणीचा खोपा ही सर्जनशीलतेची उत्तम उदाहरणे आहेत. कला किंवा कविता ही वेगळी नसते,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी व गीतकार दासू वैद्य यांनी व्यक्त केले.
युगदक्ष वाङ्मय परिवार आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ व चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आभासी प्रणालीद्वारे आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकार डॉ. अविनाश सांगोलकर होते. डॉ. प्रकाश दुकळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
वैद्य म्हणाले, ‘कळवळा येणे,अस्वस्थ वाटणे, संवेदनशीलता असणे, राग, चीड येणे, बंड करणे ही कवी होण्याची लक्षणे आहेत. कवी लिहिण्याची भूक भागवण्यासाठी कविता लिहितो. त्यातून तो व्यक्त होतो. मनाच्या घुसळणीतून कविता बाहेर येते. कवीला वाचनाचा रियाज हवा. माणूस, भवताल समजून घेतो तो खरा कवी होतो.’
डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, ‘रसिक मुका असतो; पण त्याची अभिव्यक्ती कवी करत असतो. कविता आणि गझल हे हृद्य काव्य प्रकार आहेत.’
याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अनिल गवळी, डॉ. भरत जाधव, नंदा मेश्राम, कुणाल मेश्राम, कबीर दास, डॉ. डी. आर. गायकवाड, डॉ. आनंद लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार डॉ. मांतेश हिरेमठ यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.