कोल्हापूर

मीरा बोरवणकर सुधीर भोंगळे वर राही सरनोबत यांना सा.रे पाटील पुरस्कार जाहीर

CD

85196,85197,85198
फोटो ओळ -मीरा बोरवणकर, सुधीर भोंगळे, राही सरनोबत

.....

सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार
मीरा बोरवणकर यांना जाहीर

१ एप्रिल रोजी वितरण : सुधीर भोंगळे यांना समाजकार्य तर राही सरनोबतला युवा प्रेरणा पुरस्कार

शिरोळ, ता. २५ : दत्त साखर कारखान्याचे संस्थापक व माजी आमदार दिवंगत डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ एप्रिल रोजी देण्यात येणारा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तर लेखक सुधीर भोंगळे यांना समाजकार्य पुरस्कार; तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत यांना युवा प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिरसाट म्हणाले, ‘‘सहकार महर्षी व श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुका आणि परिसरात शेतकरी सहकारी संस्थाच्या माध्यमातून समृद्धीची आणि संपन्नतेची बीजे रोवली. व्यावसायिक नितीमूल्यांचा अंगीकार करीत, ध्येयवादी पद्धतीने काम करणाऱ्या सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य किंवा उद्योग या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी मीरा बोरवणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख एक लाख एक हजार रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच या वर्षीपासून निवड समितीने परिवर्तनशील कार्यकर्त्यास स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले असून या वर्षीचा स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार कृषी क्षेत्रांतील लेखक व संशोधक सुधीर भोंगळे यांना दिला जाणार आहे. ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव लौकिक करणाऱ्या आदर्श राष्ट्रीय खेळाडू राही सरनोबत हिला स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील युवाप्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
पत्रकार परिषदेस दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील, दलितमित्र डॉ अशोकराव माने, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पाटील , व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, संचालक अनिलराव यादव, शेखर पाटील, दरगू गावडे, महेंद्र बागे, संजय पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT