कोल्हापूर

कणेरकर नगर जवळील रिंग रोड प्लास्टिकच्या विळख्यात. परिसरात दुर्गंधीच दुर्गंधी, वाऱ्याने प्लास्टिक नागरी वस्तीत. अन्नाच्या शोधात भटक्या कुत्र्यांचा उन्माद : नागरिकांच्यात भीती.

CD

01465

कणेरकरनगर केएमटी बस
स्टॉपसमोर कचऱ्याचे ढीग

स्वच्छतेची नागरिकांतून मागणी

सानेगुरुजी वसाहत, ता. १० ः येथील कणेरकरनगरच्या केएमटी बस स्टॉपसमोरच रात्री अंधाराचा फायदा घेऊन परिसरातील अनेक नागरिक मोटारसायकलवरून, चारकीमधून घरातील तसेच हॉटेल व्यावसायिक शिल्लक अन्नपदार्थ, खराब भाजीपाला, सोललेले कांद्याचे, बटाट्याचे व लसणाची टरफले टाकतात. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

कणेरकर-आपटेनगर मार्गावर मटण, चिकन, मासे विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. रात्री व पहाटे कुत्र्यांच्या झुंडी असतात. या मार्गावरून पहाटे व संध्याकाळी फिरावयास जाणाऱ्यांच्या मागे कचरा असलेल्या ठिकाणी भटकी कुत्री नागरिकांच्या मागे लागतात. क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील बाजारात भाजी खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची संख्याही मोठी असते. यावेळी भटकी कुत्री मागे लागतात. काहीवेळा भटक्या कुत्र्यांनी मुलांच्या मागे लागून काहींचे चावेही घेतलेले आहेत. दुकानदार शिल्लक पदार्थ, कचरा रस्त्याकडेला टाकतात. वाऱ्यामुळे प्लास्टिकचे कागद, पिशव्या अस्ताव्यस्त नागरी वस्तीतही पसरलेले दिसतात. महापालिकेने कचरा उठाव करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

चौकट
परिसरात वीज, सीसीटीव्हीची सोय व्हावी
कचरा टाकण्याबाबत जागृती हवी
कचरा टाकणाऱ्यांना दंड करावा
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा

कोट
01464
नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकण्याचा निश्चय करावा. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेने त्वरित कचरा उठाव करावा.
- डॉ. संतोष पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर शहर शिवसेना (शिवआरोग्य)

01463
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. आपटेनगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे प्रबोधन चळवळ सुरू आहे. लोकांनी स्वतःहून कचरा उघड्यावर टाकणार नाही याबाबत निश्चय करावा.
-निवास नलवडे, अध्यक्ष, आपटेनगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT