आजऱ्याजवळ गव्याच्या
धडकेत तरुण गंभीर
आजराः पोळगांव (ता.आजरा) नजीक गव्याने धडक दिल्याने आजरा येथील अल्ताफ नजीर लाडजी ( वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी, लाडजी हा तरुण एरंडोळ येथे आजीला भेटण्यासाठी आपली पत्नी व मुलासह गेला होता. सायंकाळी साडेसात वाजता मोटारसायकलवरुन परतताना पोळगांवजवळ अचानक गव्यांचा कळप आडवा आला. यातील एका गव्याने लाडजी यांना जोराची धडक दिली. यामध्ये लाडजी हे गंभीर जखमी झाले आहेत, तर पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथे पाठवण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.