04727
वाचन संस्कृती टिकवून
ठेवणे काळाची गरज
डॉ. विनय कोरे; कोरे फार्मसीत राष्ट्रीय ग्रंथपाल दिन
वारणानगर, ता. १३ : ‘डिजिटल युगात वाचनसंस्कृती टिकवून ठेवणे काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनात अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी येथे केले.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात विविध वाचन साहित्य प्रकारांची ओळख होऊन वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीत साहित्य प्रदर्शन झाले. यावेळी डॉ. कोरे बोलत होते.
ग्रंथालय विभाग व आयक्यूएसी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने भरविलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन, प्रस्तावित वारणा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना पाटील, प्राचार्य डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. साहित्य प्रदर्शनात मराठी व इंग्रजी भाषेच्या कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, कवितासंग्रह अशी विविध पुस्तके तसेच संग्रहित वर्तमानपत्रांतील निवडक कात्रणे मांडली होती.
स्मरणशक्ती, शब्दसंग्रह आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे नमूद करताना आयोजित उपक्रमाचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी कौतुक केले. यावेळी डिप्लोमा विभागप्रमुख प्रा. रवी पाटील, प्रा. विनय बागल, ॲडमिन ऑफिसर डॉ. यू. एस. चौगुले, ग्रंथालय समिती समन्वय प्रा. उमा माळीश, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रदर्शनासाठी प्रा. सायली पोवार, प्रा. प्रीतेश लोले, ग्रंथपाल पी. जी. पाटील, सहा. ग्रंथपाल लखन करे, विश्वनाथ फारणे, नीलेश पाटील, प्रणिल पाटील, भगवान नागावकर, नंदकुमार पाटील यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.