Vegetable Market Tomato Rate esakal
कोल्हापूर

Tomato Prices : दीड महिन्यापूर्वी 100 ला मिळणाऱ्या टोमॅटोचे दर घसरले; आता किलोला मोजावे लागतात फक्त 'इतके' रुपये

गेल्या पाच वर्षांत घाऊक बाजार पेठेत टोमॅटोला नियमित भाव मिळत होता.

सकाळ डिजिटल टीम

किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव किंचित वाढल्याचे दिसते.

कोल्हापूर : दीड महिन्यापूर्वी बाजारात (Vegetable Market) टोमॅटोच्या (Tomato) भावाने शंभरी पार केल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, गेल्या आठवड्यातील पावसानंतर नुकसान होत असल्याने मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात आला. त्याचे दर पडले. आज घाऊक बाजारपेठत ३० ते ६० रुपये दहा किलो असे भाव होते.

मात्र, किरकोळ बाजारपेठेत १० ते २० रुपये प्रती किलो असा दर होता. गेल्या पाच वर्षांत घाऊक बाजार पेठेत टोमॅटोला नियमित भाव मिळत होता. काही ठराविक कालावधीत भाववाढ किंवा घसरण होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना जेमतेम नफ्यावर टोमॅटोची विक्री करावी लागत होती. यंदा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये टोमॅटोची मागणी वाढेल तसे भाव वाढले.

याच वेळी काढणीला आलेला टोमॅटो बाजारात येत असल्याने ६० रुपये प्रती एक किलोचा टोमॅटो १२० रुपये प्रती किलो झाला. त्यामुळे भाव वाढलेल्या काळात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो परप्रांतात पाठवला जाणारा टोमॅटोही स्थानिक बाजारात आणला. त्यांना चांगला नफा मिळाला. सप्टेंबरअखेरपर्यंत चांगला भाव मिळत होता. गेल्या आठवड्यात पाऊस झाला. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एकाच वेळी टोमॅटो बाजारात आणला.

बाजारपेठेत सहजपणे टोमॅटो उपलब्ध होऊ लागला. टोमॅटोचे सौदे एक- दोन दिवसांत करावे लागतात. कोल्डस्टोरेज व्यवस्था नसल्याने टोमॅटोचा नाश होण्याचा धोका वाढला परिणामी भाव पडले आहेत. शाहू मार्केट यार्डात आज साडेतीनशे क्रेट टोमॅटोची आवक झाली. त्याचा भाव ३० ते ६० रुपये दहा किलोचा भाव मिळाला. अशी स्वस्तातील टोमॅटो खरेदी करून दुप्पट नफा कमवला जात आहे. त्यानुसार फिरस्त्या विक्रेत्यांकडे २० रुपये तर मंडईत १० ते १५ रुपये एक किलो असे भाव आहेत.

टोमॅटोची विक्री झाली नाही की नाश होतो. तेथे विक्रेत्यांचे नुकसान होते. गेल्या महिन्यात टोमॅटोचे भाव वाढले. मागणी कमी झाल्याने टोमॅटो शिल्लक राहिला. त्यात विक्रेत्यांचे नफ्याचे प्रमाण घटले होते. ते भरून काढण्यासाठी किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव किंचित वाढल्याचे दिसते.

-फिरोज शेख, विक्रेता

टोमॅटोचे भाव पडले. उत्पादन, वाहतूक व व्यक्तिगत खर्च विचारात घेता १५ क्रेट टोमॅटो विकून पाचशे रुपये उरले नाहीत. आणलेला माल कोल्डस्टोरेज नसल्याने दर वाढेपर्यंत वाट बघणे अशक्य होते. त्यामुळे पडलेल्या दरात टोमॅटोची विक्री करावी लागली..

-अशोक खोत, शेतकरी, शिरोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT