woman dead in accident at kolhapur nagaon 
कोल्हापूर

पुलाची शिरोली येथे भीषण अपघात; महिला ठार 

सकाळ वृत्तसेवा

नागाव (जि. कोल्हापूर) : उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टर ट्रॉलीला ब्रिझा मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. सविता शांतीनाथ बेडकीहाळे (वय 52, रा. भोज, ता. चिकोडी, कर्नाटक ) असे मृत महिलेचे नाव आहे. वैभव अनंत बडबडे (वय45, रा. आकिवाट, ता. शिरोळ ), सुनीता शीतल शिरहट्टी ( वय 49, रा. तळदंगे, ता. हातकणंगले ), संगीता संजय शिरगावे (वय 45, रा. इचलकरंजी ) व पद्मजा अनिल सौन्दत्ती ( वय 42, रा. भोज, ता. चिकोडी ) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री अडीचच्या सुमारास शिरोली फाटा येथे हा अपघात झाला. 

याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अपघातातील जखमी शिरहट्टी यांची मुलगी श्वेता ही पुणे येथे डिझाईनिंग इंजिनिअरिंग करत आहे. तिला भेटण्यासाठी त्या व त्यांच्या तीन बहिणी आणि बहिणीचा मुलगा वैभव बडबडे असे पाचजण ब्रीझा मोटार ( एमएच 09 डीएक्‍स 7794) मधून काल पहाटे पुण्याला गेल्या होत्या. संध्याकाळी जेवण करून हे सर्वजण पुण्यातून बाहेर पडले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील पार्श्वनाथ स्टील समोर मोटर चालक वैभव बडबडे याचा गाडीवरील ताबा सुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॉलीवर गाडी आदळली. यामध्ये बेडकीहाळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन बहिणी व वैभव असे चार जण गंभीर जखमी झाले. वैभव हा मोटार चालवत असल्यामुळे बेजबाबदारपणे मोटर चालवून उसाच्या ट्रॉली पाठीमागून धडकल्याने त्याच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

Latest Marathi News Live Update : दोन पोलिस अधिकाऱ्यांना केले सेवेतून बडतर्फ

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT