wrestling computation in sake kagal
wrestling computation in sake kagal 
कोल्हापूर

साकेत उद्या रंगणार कुस्तीचे जंगी मैदान....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर- साके (ता.कागल) ग्रामस्थ, युवा संघटना तसेच कुस्ती हेच जीवन यांच्या वतीने रविवार (ता. १) मार्च रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील मल्ल या मैदानात लढणार आहेत.या मैदानात महिला मल्लांच्या ही लढती होणार आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या महाष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील लढतींचे क्षणचित्राचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात येणार आहे.

अशा रंगणार प्रमुख लढती... 

 पैलवान सुदेश ठाकूर (हांडे -पाटील तालीम, सांगली) विरुद्ध पैलवान  विभीषण मांडेकर  (राष्ट्रकुल कुस्ती संकुल),  द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै. सुभाष निऊंगरे (साके) विरुद्ध पै. दयानंद घटप्रभा (कर्नाटक),  तृतीय क्रमांकाची कुस्ती-  पै. भगतसिंग खोत (कुंभीकासारी ) विरूध्द पै. अतुल डावरे ( मोतीबाग तालिम कोल्हापूर ) चतुर्थ क्रमांकाची कुस्ती पै. भारत पाटील (सोनगे) विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. रुपेश पाटील (इचलकरंजी)यांच्यात होणार आहे. तसेच महिला लढती प्रथम राष्ट्रीय खेळाडू कु.पै. श्रुष्टी भोसले (राष्ट्रकुल कुस्ती संकुल) विरुद्ध कु.पैलवान मेघा चव्हाण (इस्लामपूर) यांच्यात कुस्ती होणार आहे.

यांची राहणार प्रमुख उपस्थीती 

मैदानास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, भाजपा जिल्हाअध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार  प्रकाश आबिटकर, संजयबाबा घाटगे,  जि.प.सदस्य  मनोज फराकटे, रणजितसिह पाटील, शिवसेना तालुकाअध्यक्ष अशोक पाटील, राजे बॅंकेचे  चेअरमन एम.पी.पाटील, संजय पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघ उपाध्यक्ष  डी. आर. जाधव, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, नामदेवराव मोहिते, पै. दिनानाथ सिंह, पै. रवींद्र पाटील, पै.अमृत भोसले, पै. गुंडाजी पाटील, उपस्थीत राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : प्रतीक्षा संपली! देशात मतमोजणी सुरू... पंजा की कमळ? मोदी अन् राहुल गांधी यांच्या हृदयाचे वाढले ठोके

Lok Sabha: एक्झिट पोल कितपत ठरणार खरे? महाराष्ट्रात भाजप पुन्हा ठरणार मोठा भाऊ? शिंदे- अजित पवारांचं काय? मविआ कितीचा गाठणार टप्पा

Maharashtra Lok Sabha Election Results Live : संभाजी नगरमध्ये पोलिस अन् कार्यकर्त्यांमध्ये वाद

लोकसभेचा निकाल घरी बसूनच पाहा! ‘या’ संकेतस्थळावर पहायला मिळेल प्रत्येक मतदारसंघाचा फेरीनिहाय निकाल

Varun Dhavan : वरुण धवन, नताशा बनले आई-वडील, झाली मुलगी

SCROLL FOR NEXT