Lok Sabha: एक्झिट पोल कितपत ठरणार खरे? महाराष्ट्रात भाजप पुन्हा ठरणार मोठा भाऊ? शिंदे- अजित पवारांचं काय? मविआ कितीचा गाठणार टप्पा

Maharashtra Lok Sabha: आज महाराष्ट्रासह देशातील लोकसभेचा निकाल समोर येणार आहे. अवघ्या काही मिनीटांमध्ये म्हणजेच ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे.
Maharashtra Lok Sabha
Maharashtra Lok SabhaEsakal

आज महाराष्ट्रासह देशातील लोकसभेचा निकाल समोर येणार आहे. अवघ्या काही मिनीटांमध्ये म्हणजेच ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे. सर्वच उमेदवारांनी आपल्या विजयांचा विश्वास व्यक्त केला आहे. देशासह महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आत्तापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलपैकी किती पोल खरे ठरणार आणि राज्यात कोण बाजी मारणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

राज्यात घडलेल्या मोठ्या घडामोडीनंतर होणारी ही निवडणूक चुरशीची ठरली. राज्यातील मोठे पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तर शरद पवार गट आणि ठाकरे गट यांना राज्यात काँग्रेसची मोठी साथ देखील मिळाली आहे. दुसरीकडे महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत. यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली आहे.

Maharashtra Lok Sabha
Maharashtra Exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा युती की महाविकास आघाडी? असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज

निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जवळपास १० ते २० जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो, असा अंदाज देखील एक्झिट पोलने वर्तवला आहे.

टीव्ही 9 पोलस्ट्रार्टचा एक्झिट पोलनुसार महायुतीला तब्बल 22 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे याच एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकूण 25 जागा मिळू शकतात. हा आकडा महाविकास आघाडीसाठी मोठा आहे.

Maharashtra Lok Sabha
Lok Sabha Election Result 2024 : आठ हजार जणांचे भवितव्य आज ठरणार

भाजप - 18

शिवसेना (शिंदे गट)- 04

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 00

काँग्रेस - 05

शिवसेना (ठाकरे गट)- 14

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 06

याशिवाय 1 जागा ही अपक्षाला मिळू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra Lok Sabha
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

महाराष्ट्रातील लोकसभेच्या टीव्ही 9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वात जास्त जागा मिलतील असा अंदाज आहे. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या गटाला एकही जागा मिळाली नसल्याचे पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता एक्झिट पोलचे नेमके आकडे कितपत खरे ठरतात हे आज निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला समोर येणार आहे.

Maharashtra Lok Sabha
Lok Sabha elections results 2024: मोदी की गांधी? केंद्रात कुणाची सत्ता? वाचा प्रचार गाजवणारे मुद्दे...

२०१९ निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी तब्बल ४१ जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५ आणि काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली होती. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता. आता २०२४ च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती, कोणत्या आघाडीला सर्वात जास्त जागा मिळणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, निवडणूक निकालाआधीच अनेक संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला २६ ते २८ आणि महाविकास आघाडीला २० ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. आज ८ वाजल्यानंतर मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

Maharashtra Lok Sabha
Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com