yet organizational quarantine ... 
कोल्हापूर

लक्षणे नाहीत, रेड झोनमधून नाही, तरीही संस्थात्मक क्वारंटाईन... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीची कोरोना तपासणी झाले पाहीजे, लक्षणे दिसत असतील तर क्वारंटाईन केले पाहीजे, गरजेनुसार उपचार सुरू पाहिजे. याविषयी कोणाचेही दुमत नाही. पण बाहेरगावावरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर आहे.

यात अनेकांना कोणतीच लक्षणे नाहीत. किंवा रेडझोनमधूनही आलेले नाहीत, तरीही संस्थात्मक क्वारंटाईनही केले जाते. त्यामुळे रोजगारापासून ते शासकीय खर्चा पर्यंत अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. अशा क्वारंटाईनबाबत वेगवेगळे संदर्भ दिले जात असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. याशिवाय मनस्ताप सोसावा लागत आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. गेल्या महिन्याभरात तो टप्प्याने-टप्प्याने शिथील करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात गर्दी होण्याची ठिकाणे वगळता बहुतेक व्यवहार सुरू झाल्याचे दिसत आहे. सर्वत्र वर्दळ सुरू आहे. 

जिल्ह्यातील कोरोनारूग्ण संख्या वाढत असली तरी नियंत्रणात आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिकसह ज्या भागात कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्याभागातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी झाली पाहीजे. त्यानुसार होत आहे, मात्र, कोणतेही लक्षणे नाहीत. स्वॅब तपासणीला न घेता फक्त क्वारंटाईनकरून ठेवले जाते. अशा प्रकारे अन्य राज्य व जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूरात फक्त जास्त कडक आहे. यातून क्वारंटाईन झालेल्या अनेक व्यक्तींना लवकर सोडा म्हणून राजकीय नेत्यांपासून अनेक पातळ्यांवर प्रयत्न होतात. यातून क्वारंटाईन कक्षातील व्यक्तीवर आरोग्य तपासणी करणाऱ्या खासगी, शासकीय डॉक्‍टरांवर दबाव येतो. तर महापालिकेच्या प्रभाग समितीकडेही दाखला नेण्यासाठी दबाव येतो, असा प्रकार रोजचा सुरू आहे. 

वरील स्थिती पहाता क्वारंटाईनचे नियम वेगवेगळे सांगितले जातात. अशात अनेकजण केवळ क्वारंटईनच्या धसक्‍याने परजिल्ह्यात अडकले आहेत. तर काहीजणांनी कोल्हापुरातून बाहेर जाण्याचे टाळले आहे. यातून जे व्यक्ती आरोग्य तपासणीकरून जिल्हा प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन आलेल्या कोणतीही लक्षणे नसलेल्या अशा व्यक्ती क्वारंटईन झाल्या आहेत. यात ज्यांच्या खासगी व्यवसाय आहे तो बुडाला आहे. काहीची नोकरी जाण्याची वेळ आली. उदरनिवार्हचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

आजपर्यंत 25 हजारांवर क्वारंटाईन... 
शासकीय कोवीड सेंटर मध्ये क्वारंटाईन केल्यानंतर सकाळी चहा नाष्ठा दुपारी जेवण संध्याकाळी चहा व रात्री जेवण अशा सुविधा पुरविल्या जातात त्याचा खर्च शासना मार्फत केला जातो. जिल्हाभरात आजवर जवळपास 25 हजारांवर व्यक्ती क्वारंटाईन झाल्या आहेत. नव्याने येणाऱ्या बहुतेक सर्व व्यक्तीना क्वारंटईन केले जात आहे. 

दृष्टिक्षेप 
- क्वारंटाईनबाबत वेगवेगळ्या संदर्भामुळे गोंधळ 
- स्वॅब तपासणीला न घेता क्वारंटाईन करून ठेवले जाते. 
- लवकर सोडण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न 
- खासगी, शासकीय डॉक्‍टरांवरही दबाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT