young boy protest in kolhapur mahagaon
young boy protest in kolhapur mahagaon 
कोल्हापूर

Video -शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा, अन्यथा टॉवरवरून मारणार उडी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यातील महागाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूतळा बसविण्याच्या मागणीसाठी  एका तरूणाने टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. १९ तारखेपर्यंत शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला नाही तर टॉवरवरून खाली उडी मारणार असल्याचा इशारा या तरूणाने दिला आहे. सागर मांजरे असे या तरूणाचे नाव आहे. 

महागावमध्ये शिवाजी महाराज यांचा जुना पुतळा काढल्यानंतर तेथे नवीन पुतळा बसविण्यासाठी दोन गटात वाद सुरू आहे. हा वाद मिटवून महाराजांचा पुतळा बसवावा या मागणीसाठी या तरूणाने हे आंदोनल केले आहे. फेसबुक लाईव्ह करून या तरूणाने प्रशासनाला टॉवरवरून उडी मारण्याचा इशारा दिला आहे. 

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस आणि गावातील नागरिक त्या तरूणाला खाली उतरण्यासाठी विणंत्या करत आहेत. परंतु, तो आपल्या मागणीवर ठाम आहे. त्याचे आंदोलन पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT