पश्चिम महाराष्ट्र

साडेबारा लाखांत कोल्हापुरात घ्या फ्लॅट

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - चौफेर पर्यटन विकास व्हावा, कृषिपूरक उद्योगांना बळ द्यावे, प्राधिकरणातील गावांत पायाभूत सुविधा सक्षम कराव्यात, शहरात बहुद्देशीय सभागृह व्हावे, अशा सुविधा सक्षम केल्यास शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल; त्यातून जागा, इमारतींचे भाव आटोक्‍यात राहतील. तेव्हाच सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारणे शक्‍य होईल. क्रिडाई संस्थाही त्याला बळ देईल, असा विश्‍वास ‘क्रिडाई’च्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ कार्यालयात झालेल्या ‘कॉफी वुईथ सकाळ’मध्ये व्यक्त केला.

शहरात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. अंबाबाई मंदिर, जोतिबा, पन्हाळा, रंकाळा अशी ठराविक ठिकाणे पाहून झाली की त्यांचे पर्यटन संपते. त्यामुळे पर्यटन विस्तारित करावे लागेल. शहराच्या अवतीभोवती किंवा ग्रामीण भागातील पर्यटन व प्रेक्षणीय स्थळांचा विकास केल्यास पर्यटक वाढतील. त्यांचा निवास वाढेल व आर्थिक उलाढाल वाढेल. 

अनेक जण शहरात राहण्याला प्राधान्य देतात. तेव्हा शहरातील गर्दी वाढते, ग्रामीण भागात जाण्यास लोक तयार नसतात. कारण तिथे पाणीपुरवठा, रस्ते, दवाखाने अशा सक्षम पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे किमान प्राधिकरणातील गावांत तरी पायाभूत सुविधा सक्षम केल्यास त्या गावात राहण्याला लोक प्राधान्य देतील. यातून जागांचे प्रश्‍न मार्गी लागतील, ग्रामीण भागात रोजगार व निवासाच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे.  

रोजगार वाढला तर लोकांकडे पैसे येतील, पैसे आले तर त्यांना घर घेता येईल. आज जागा आहे; पण घर नाही किंवा घर नाही आणि जागाही नाही अशी अनेकांची अडचण आहे. अशा व्यक्तींना घर घेण्यासाठी ‘पंतप्रधान आवास’ योजना आली आहे. याशिवाय, शासनाच्या अन्य घरकुल योजना आहेत. त्यांचा लाभ घेणे शक्‍य होणार आहे. लोकांना हवी असलेली घरे तयार करण्यासाठी आवश्‍यक तंत्रज्ञानासह ‘िक्रडाई’ सज्ज आहे. लोकांनीच रोजगार व सार्वजनिक स्तरावर पायाभूत सुविधा सक्षम करणे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस पाठपुरावा करणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा ‘िक्रडाई’चे अध्यक्ष महेश यादव यांनी व्यक्त केली.

घर घ्यायचंय.. घर...
‘शहरातील सर्वांना घर’ ही संकल्पना आता केवळ जाहिरातीत नाही, तर प्रत्यक्षात आपल्या शहरात साडेबारा लाख रुपयांना वन बीएचके फ्लॅट उपलब्ध केला आहे. तब्बल ३५ हजार ग्राहकांना याचा लाभ देण्याचा ‘क्रिडाई’चा मानस आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असून शहरात चार ठिकाणी हा उपक्रम लवकरच सुरू होत आहे. मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाली असून बॅंकांकडूनही कर्जपुरवठा केला जाणार आहे. तीन ते सहा लाखांपर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे, अशांना ‘वन’ आणि ‘टू बीएचके’ फ्लॅट सवलतीत उपलब्ध केले जात आहेत. शहरात मध्यवस्तीत हे प्रकल्प होत असून, बुकिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT