पश्चिम महाराष्ट्र

कृष्णा रंणांगण; प्रचारसाठी तिन्ही पॅनेलच्या नेत्यांची मोर्चेबांधणी

शामराव गावडे

नवेखेड : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत गुलाल आपलाच असे सांगत तिन्ही पॅनेलच्या समर्थकांनी पॅनेलला विजयाची संधी असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. कृष्णाच्या निवडणुकीत सरकार, संस्थापक व रयत अशी तिरंगी लढत रंगली आहे. तिन्ही पॅनेलने आपल्या परीने या निवडणुकीत रंगत आणली आहे.

रणशिंगाची दुधबी, हलगीचा कडकडाट, नेत्यांच्या विजयाच्या घोषणा, आसमंत दणाणून निघाला आहे. कराड तालुका, घाट माथा व वाळवा तालुका या ठिकाणी या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. आज अखेर भल्याभल्यांचा कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा अंदाज चुकला आहे. तिनही पॅनेल दिवसभर घरगुती बैठका, उमेदवारांकडून सभासदांशी संवाद, रात्री पॅनलच्या प्रमुख नेत्यांची मोठ्या गावात सभा असे प्रचाराचे सूत्र ठेवली आहे.

सोशल मीडियाचा या प्रसारासाठी वापर केला जात आहे. प्रत्येक पॅनलच्या पोस्टरवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमा आहेत. सहकार पॅनलकडून घरपोच साखर, खाजगीकरण होणार नाही अशा पद्धतीचे आश्वासन जाहीर सभांमधून दिले जात आहे. संस्थापकांकडून पूर्वीच्या पाच वर्षात चालवलेला कारखाना अक्रियाशील सभासदांना मतदानाचा हक्क देणार, वारसा नोंदी करणार अशी आश्वासने दिली जात आहे. रयतकडून पूर्वीच्या कारभाराचे समर्थन केले जात आहे. या जाहीर सभांमधून ग्रामीण बोली भाषेतील वक्त्यांच्या कष्टावर लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे.

शिट्ट्या टाळ्या वाजत आहेत. हे भक्ती विरोधी पॅनलमधील त्यांचा स्वभाव, त्यांच्या लकबी इतिहास मांडताहेत. या सभा, सभासदांचे प्रबोधन करण्याबरोबरच मनोरंजन करणारे ठरत आहेत. पारकट्टे, सार्वजनिक कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम या ठिकाणी कृष्णेत कसं होईल? कुणाची सत्ता येईल? कुणाची आली पाहिजे क्रॉस वोटिंग होणार का? अशाच चर्चा रंगली आहेत. या चर्चेच्या उत्तरासाठी एक जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे हे नक्की

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT