पशुधन
पशुधन Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : जिल्ह्यात पशुधनाच्या संख्येत मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - जनावरे पाळणाऱ्यांच्या संकेत घट झाली असल्याचे बोलले जात होते. मात्र, जिल्ह्यात पशुधनाच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती जनावरांच्या गणती दरम्यान पुढे आली आहे. पशु संगोपन खात्याकडून दर पाच वर्षांतून एकदा जनावरांची गणती केली जाते. २०१९ पासून २०२१ पर्यंत २० व्या गणतीत सर्व प्रकारच्या जनावरांची गणती करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यात गाई, बैल, रेडे, शेळ्या-मेंढ्या डुक्कर यांची संख्या २९ लाख ५९ हजार ८४५ इतकी आहे. जिल्ह्यात पशु संगोपन खात्याकडून २०१२ मध्ये करण्यात आलेल्या १९ व्या राष्ट्रीय गणती अहवालानुसार जनावरांची संख्या १९.२० लाख होती. २० व्या गणती मध्ये त्यात १० लाखाने वाढ झाली आहे. नजीकच्या बागलकोट, विजापूर, धारवाड जिल्ह्यामध्ये देखील जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देसी गाईंच्या संख्येची १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे तसेच प्रोत्साहन आणि अनुदान मिळत असल्याने २०१७ ते २०२२ या काळात म्हशी गाई पाळण्याचे प्रमाण वाढण्याचे हे प्रमुख कारण आहे. देशी जनावरांच्या संख्येत शेकडा ते २० टक्के वाढ झाली आहे. बैल प्राण्यांच्या संख्येत ३५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

पशु संगोपन खात्याच्यावतीने करण्यात आलेल्या गणतीनुसार चार-पाच वर्षांमध्ये बेळगाव, चिकोडी, बैलहोंगल या भागात म्हशी पाण्याच्या संकेत ८ लाख ४४ हजार १७१ इतकी वाढ झाली आहे. २०१९ च्या गणतीची तुलना केल्यास म्हशी पाळण्यामध्ये ३५ टक्के (७.१९ लाख) इतकी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रायबाग आणि अथणी तालुक्यामध्ये म्हशींची संख्या १ लाख इतकी पार झाली आहे. सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यात म्हशींची संख्या ३० हजार पार झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जनावरांच्या किमती वाढल्या

गेल्या चार-पाच वर्षाच्या काळात गाई, म्हशी आणि बैल विक्री दरात मोठी वाढ झाली आहे. देसी तसेच संक्रमीत गाईंची किंमती ६० ते ९० हजार रुपये. म्हैशी ४५ ते ७५ हजार रुपये दराने विक्री केल्या जात आहेत. बैलांच्या जोडीला ६० हजार ते १ लाख २० हजार रुपये पर्यंत किंमत मोजावी लागत आहे.

जिल्ह्यात गाई, म्हशी आणि शेळ्या पाळण्याची संख्या वाढली असल्याचे गणती दरम्यान दिसून आले आहे. बैल आणि मेंढ्या पाळण्याची प्रमाण घटले आहे दरवर्षी देशी आणि संक्रमीत जनावरे पाळण्याच्या संकेत वाढ होत आहे.

- डॉ. ए. के. चंद्रशेखर, उपसंचालक पशु संगोपन खाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT