Larvha mosquito finds in home at solapur
Larvha mosquito finds in home at solapur 
पश्चिम महाराष्ट्र

अरे बाप रे..! सोलापूरतल्या घरात आढळल्या लारव्हा आळ्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील 2176 घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंगी-हिवतापाच्या डासांच्या "लारव्हा' (अळ्या) आढळून आल्या. लारव्हा आढळून आलेल्या ठिकाणच्या नागरिकांना ते पाणी टाकून देण्याची सूचना देण्यात आली असून, पाण्यामध्ये अबेट या अळीनाशकाची फवारणी करण्यात आली आहे. कंटेनरमध्ये अळ्या आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. 1 ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीतील ही आकडेवारी आहे. तसा अहवाल आज मंगळवारी आरोग्याधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला. 

घरातील हौद, कुलरमधील पाणी, रिकामे टायर, गेल्या सात ते आठ दिवसांपासून साठविण्यात आलेले पाणी असे स्वरूप या घरांमध्ये होते. या घरमालकांना पाणी टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सापडलेले डास हे अळीच्या स्वरूपात होते. हे पाणी आणखी चार ते पाच दिवस तसेच ठेवले असते, तर अळीचे रूपांतर डासांत होऊन, त्यापासून डेंगी व चिकुन गुनियाचा प्रसार झाला असता. त्यामुळे या पाण्यात तातडीने "अबेट' या कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. आदित्यनगर, सिद्धेश्‍वरनगर, विजयपूर नाका, मल्लिकार्जुननगर, विद्यानगर, रविवार पेठ, विमा रुग्णालय परिसर, कर्णिकनगर, मौलाली चौक, अवंतीनगर, आदित्यनगर, भारतमातानगर, मजरेवाडी, जुळे सोलापूर, बापूजीनगर, मुळेगाव रस्ता या परिसरात तपासणी करण्यात आली. 

अशी होते डेंगीची लागण 
डेंगी हा ताप गंभीर स्वरूपाचा असून, एडीस इजिप्ती डासाच्या मादीपासून त्याचा प्रसार होतो. रुग्णांपासून निरोगी व्यक्तींना त्याचा संसर्ग होतो. डेंगी ताप, डेंगी हिमरिजिक फिव्हर (रक्तमिश्रित रुग्ण) आणि डेंगी शॉक सिंड्रोम असे या आजाराचे प्रकार आहेत. 

डेंगीची लक्षणे 
दोन ते सात दिवसांपासून तीव्र स्वरूपाचा ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, अंगावर पुरळ येणे, तोंड, नाकातून रक्तस्राव होणे, रक्तदाब कमी होणे, प्लेटलेट काउंट कमी होणे. औषधोपचारामुळे 90 टक्के रुग्ण बरे होतात. मात्र, प्रतिकारशक्ती कमी असलेल्या 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. 

डेंगीपासून बचावासाठी... 
पाणी झाकून ठेवावे. अडगळीचे सामान, रिकामे डबे, फुटकी भांडी, बिनकामाचे टायर नष्ट करावेत. ताप आल्यास रक्ताची तपासणी करावी. वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणी, रासायनिक कॉईलचा वापर करावा. साठलेले पाणी वाहते करावे. डासोत्पत्ती होऊ नये यासाठी पाण्यात गप्पी मासे सोडावेत. 

आकडे बोलतात... 
तपासलेली एकूण घरे ः 37242 
लारव्हा आढळलेली घरे ः 2176 
तपासलेले कंटेनर ः 77229 
लारव्हा आढळले ः 2423 

आजार डास उत्पत्ती स्थान 
हिवताप अनफ्लेक्‍स साचलेले स्वच्छ पाणी 
हत्तीरोग क्‍युलेक्‍स गटारातील घाण पाणी 
डेंगी एडीस इजिप्ती हौदात साचलेले पाणी

डेंगीच्या डासाची उत्पत्ती 
अंडी ः एक ते सात दिवस 
अळी ः आठ ते अकरा दिवस 
कोष ः बारा ते तेरा दिवस 
डासात रूपांतर ः चौदावा दिवस 

लारव्हा आढळलेल्या घरांमध्ये तसेच कंटेनरमध्ये अबेट हे अळीनाशक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. तसेच धुरावणी व फवारणीही करण्यात येत असून, नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. 
- पूजा नक्का, जीवशास्त्रज्ञ, 
महापालिका हिवताप विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT