daru
daru 
पश्चिम महाराष्ट्र

सातारा - धोंडेवाडीतील महिलांकडून दारुअड्डा उध्वस्त 

संजय जगताप

मायणी (सातारा) : धोंडेवाडी (ता. खटाव) येथील महिलांनी दारू विक्रेत्यांविरुद्ध दंड थोपटले. संघटित होत रणरागिणींनी पोलिसांच्या सहकाऱ्याने गावातील दारूचा अड्डा उध्वस्त केला. त्याचबरोबर गावालगतच्या मिरज-भिगवण राज्यमार्गावरील धोंडेवाडी हद्दीतील दोन ढाबे व दातेवाडीतील दारु अड्डयावरही धाड टाकली. मात्र धाडीची आधीच चाहुल लागल्याने तेथे हाती काहीच लागले नाही. दारुविक्रेता निवृत्ती दादू घाडगे (वय 70) या वृद्धास पोलिसांनी ताब्यात घेतले.

येथे दारुविक्रीचे प्रमाण वाढले असुन तरुण मुलेही व्यसनाधिन झाली आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे महिला वर्गात दारु विक्रेत्यांविरुद्ध संतापाची लाट निर्माण झाली आहे. दारुविक्री बंद करण्याची मागणी करुनही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने महिलांमध्ये संताप वाढत चालला होता. त्या रणरागिणींनी दारुविक्रीचे अड्डे उध्वस्त करण्याचा चंग बांधला. पोलिसांना बोलावुन घेतले. संगीता घाडगे, रंजना घाडगे, स्मिता शेळके आदी आघाडीच्या महिलांसह तरुणांचा गट पोलिसांसमवेत दारू अड्डयांकडे गेला. तेथे पोचताच दारुविक्रेत्या निवृत्ती घागडेंनी तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र  पळुन जाता आले नाही. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा दारुविक्रीचा परवाना नसल्याचे सांगुन दारुसाठ्याचा मालक सोमनाथ उर्फ बंडू एकनाथ घाडगे (रा. नागेवाडी ता. खानापुर जि. सांगली) यांचा असल्याचे सांगितले.

दरम्यान, दारुविक्रेत्या घाडगे यांना काही समजण्याच्या आत पडक्या घरामागील भिंतीच्या आडोशाला ठेवलेली देशी दारुची खोकी महिलांनी घराबाहेर आणुन टाकली. तेथेच उपलब्ध असलेल्या काठ्यांनी दारूच्या बाटल्या फोडुन टाकल्या. घाडगे यांच्या घराशेजारी दारुच्या शेकडो रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेलाही महिलांनी पाहिला. दारुच्या बाटल्या फोडल्यानंतर त्यांनी गावालगतच्या मिरज-भिगवण राज्यामार्गावरील ढाब्याकडे मोर्चा वळवला. तेथील दोन्ही ढाब्यावर बेकायदा देशी दारुची विक्री होत असल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले. मात्र तेथे टाकलेल्या धाडीत काहीही हाती लागले नाही. त्यानंतर गावाच्या पुर्वेकडील दातेवाडीतील दारु अड्ड्यावर ही धाड टाकण्यात आली.

तेथेही महिलांना रिकाम्या हातांनी परतावे लागले. दरम्यान पोलीसांनी दारु विक्रेता निवृत्ती घाडगे यांस ताब्यात घेतले. मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी विकास जाधव, प्रकाश कोळी, नवनाथ शिरतोडे यांनी सपोनि संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ती कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT