पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : सांगली तिरंगी लढतीकडे...! 

सकाळवृत्तसेवा

सांगली - सांगलीची जागा "स्वाभिमानी'कडून लढा अन्यथा मी माझा उमेदवार देतो असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी आज कॉंग्रेसचे बंडाच्या पवित्र्यातील नेते विशाल पाटील यांना अखेरचा पर्याय दिला. जयसिंगपूर येथे आज विशाल यांनी बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक यांच्यासह भेट घेतली. त्यामुळे आता सांगलीत तिरंगी लढतीचे चित्र तयार होत असून विशाल कोणत्याही स्थितीत बंडखोरीच्या पवित्र्यात असून ते अपक्ष म्हणून लढले तर स्वाभिमानी व कॉंग्रेस आघाडीकडून गोपीचंद पडळकर उमेदवार असू शकतात. 

विशाल यांनी कालपासून संपर्क दौरे सुरू केले आहेत. कालच सांगलीची जागा स्वाभिमानीची असून ती जागा लढवली जाईल असे कोल्हापूर येथे खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले होते. त्यामुळे स्वाभीमानी सांगलीची जागा वसंतदादा घराण्यासाठी सोडणार ही शक्‍यताही आता संपली आहे.

जयसिंगपूर येथील बैठकीतही विशाल पाटील यांनी ही जागा कॉंग्रेसकडून लढवण्याचा आग्रह धरला. मात्र शेट्टी यांनी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. खासदार शेट्टी यांनी दादा घराण्यावरील प्रेमाखातर विशाल यांना स्वाभिमानीकडून लढण्याची ऑफर दिली. आज सायंकाळपर्यंत कळवा त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू असेही त्यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान विशाल स्वाभिमानीकडून लढण्यास उत्सुक नाहीत.

विशाल यांचे परतीचे दोर कापल्यामुळे त्यांच्यापुढे लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उमेदवारी अपक्ष की स्वाभिमानीची एवढाच त्यांच्याकडून निर्णय बाकी आहे. अपक्ष लढावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यांनी मिरज तालुक्‍यात कार्यकर्त्यांच्या संपर्क भेटी सुरु केल्या आहेत. बैठकीतील चर्चा गोपनीय ठेवली आहे. 

खासदार शेट्टी सांगलीतून कोणाला उमेदवारी देणार? याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे खासदार शेट्टींच्या निर्णयानंतरही विशाल यांची लढण्याची व्यूहरचना निश्‍चित ठरेल. दरम्यान भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी कालपासून लढण्यासाठी भेटी सुरु केल्या आहेत.

आटपाडी येथे त्यांनी आमदार अनिल बाबर समर्थक तानाजी पाटील यांची भेट घेत सहकार्याचे आवाहन केले. ते आटपाडी तालुक्‍याच्या आस्मितेच्या मुद्दयावर माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचीही भेट घेणार आहेत असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचे सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सांगतील भेट घेतली. त्यामुळे पडळकर यांच्या गोटातून लढतीसाठी हालचाली गतीमान झाल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT