Sharad Pawar
Sharad Pawar 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : लोकसभेचा ‘संग्राम’ जिंका

सकाळवृत्तसेवा

नगर - ‘सर्वांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करावे. महाआघाडीचा धर्म पाळावा,’’ असा कानमंत्र देत संग्राम जगताप यांना निवडून आणण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांना केले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील रणनीती आखण्यासाठी पवार यांनी पदाधिकाऱ्यांची चार तास प्रदीर्घ बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी थेट तालुकापातळीवरील पदाधिकाऱ्यांशी हितगुज केले. तालुक्‍यातील प्रश्‍न विचारत एकूण परिस्थितीचा अंदाजही घेतला.

आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास व देविदास कर्डिले यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अठरा नगरसेवक स्वगृही
महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या १८ नगरसेवकांसह शहर-जिल्हाध्यक्षांवरील कारवाई आज मागे घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT