Solapur-and-Madha-Candidate
Solapur-and-Madha-Candidate 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : उमेदवारीवरून पक्षांची घालमेल

अभय दिवाणजी

सोलापूर - उमेदवारीवरून सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपची घालमेल सुरू आहे. माढ्यातून शरद पवार यांनी लढण्याचे जाहीर केल्यानंतर पक्षातील बंडाळी काही काळ थांबली होती. मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर आता माढ्यात बंडखोरीची, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ मिळण्याची धास्ती निर्माण झाली आहे.

माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यास उमेदवारी न मिळाल्यास पुत्र रणजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दबावतंत्रावर ठाम आहेत. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिल्यास फलटण भागातील नेत्यांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे.

माढा भागातून आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व मोहिते-पाटील यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य यांना कामाला लागण्याची सूचना केल्यानंतर विद्यमान खासदार ॲड. शरद बनसोडे यांनी त्यांच्या जातीच्या दाखल्यावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. राज्यसभेचे खासदार अमर साबळे हे परके उमेदवार असल्याचे सांगत आपलीच उमेदवारी फायनल होईल, असा दावा केला आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी राजेश मुगळे, अर्जुनराव वाघमारे यांचे प्रयत्न आहेत.

शिंदेंपुढे आव्हानांचे डोंगर
खासदार अमर साबळे यांच्या उमेदवारीसाठी सहकारमंत्री गटाकडून दबाव येत आहे. महाराजांना उमेदवारी दिल्यास भाजपची प्रतिमा दलितविरोधी होईल याबाबत दबक्‍या आवाजात चर्चा आहे. काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी ‘फायनल’ असून गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला गती आली आहे. पाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली कणखर भूमिका, जनमानसातील त्यांचे उंचावलेले स्थान, माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी घेतलेली माघार यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT