Udayanraje-Bhosale
Udayanraje-Bhosale 
पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घ्या - उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा

सातारा - ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे, तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. काय व्हायचेय ते होऊ द्या; मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाला दिले.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु सर्वसामान्यांच्या खिशातून टॅक्‍सच्या माध्यमातून जाणाऱ्या पैशाचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. न्यायालये ईव्हीएमबाबत आग्रही राहात आहेत. सर्वोच्च न्यायालयच जर अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा?

निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा करावा.सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएमबाबत घेतलेली भूमिका योग्य नाही. याचिका दाखल करणाऱ्यालाच न्यायलयाने कारवाईची तंबी दिली आहे. माझे या दोघांना खुले आव्हान आहे. मी राजीनामा देतो. बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घ्या. कोणाला उभे राहयचेय ते राहू द्या. माझे मताधिक्‍य साडेतीन लाखांवर नाही गेले तर बोला, असे आव्हानही त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT