पश्चिम महाराष्ट्र

सांगलीकरांना आता पाईपमधून गॅस

संतोष भिसे

मिरज - जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सांगली, मिरज व कुपवाड ही महापालिका क्षेत्रातील शहरे ; आष्टा व इस्लामपूरमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवला जाईल. सांगली व सातारा जिल्ह्यांत भारत गॅस आणि कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी गॅस पुरवणार आहे.

पाईपलानद्वारे मिळणारा गॅस पारंपारीक सिलींडरपेक्षा १० ते ४० टक्के स्वस्त असेल. शिवाय सुरक्षितही. केंद्राच्या गेल ( गॅस ॲथारीटी ऑफ इंडिया) कंपनीने सांगली व कोल्हापूरसाठी या दोन कंपन्यांना प्राधिकृत केले आहे. पाईप ॲण्ड नॅचरल गॅस रेग्युलेरेटरी बोर्डाकडून त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. कोकण किनारपट्टीवरील दाभोळ बंदराजवळून दाभोळ-बेंगलुरु ही गेलची गॅस पाईपलाईन पुणे-बेंगलुरु महामार्गाला खेटून गेली आहे.

वाघवाडी फाट्याजवळ तिला जोड देऊन तो सांगली जिल्ह्यात प्रवेश करेल. पेठ, इस्लामपूर, आष्टा व वाळवा या शहरांना कव्हर करत सांगली-मिरजेकडे येईल. महापालिका क्षेत्रात मागणीनुसार कुटुंबांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवला जाईल. प्रत्येक कनेक्‍शनला स्वतंत्र मीटर असेल, त्याद्वारा गॅसचे बिल निश्‍चित होईल. मीटर रिडींगसाठी कर्मचारी असतील. प्रसंगी डिजीटल स्वरुपातही नोंद ठेवण्याचे नियोजन आहे. 

भारत गॅस कंपनीने काही सल्लागार कंपन्यांकडून लाभार्थी शहरांतील कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे. आष्टा, इस्लामपूर व वाळवा शहरांचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. महापिलकाक्षेत्राचे सर्वेक्षण जुलैअखेर पुर्ण होण्याची अपेक्षा आहे. कच्च्या झोपड्या, कुडाची घरे किंवा आगीला भक्ष्यस्थानी पडू शकणाऱ्या घरांना पाईपलाईनद्वारे कनेक्‍शन मिळणार नाही. सिमेंटची तसेच दगड-मातीच्या व माळवदी घरांना मिळेल.

स्फोटाची शक्‍यता अत्यंत कमी​

सिलिंडरमधील गॅस म्हणजे द्रवरुप स्वरुपातील प्रोपेन व ब्युटेन असतो. हवेपेक्षा जड असल्याने खालीच राहतो व स्फोटाचा धोका बळावतो. पाईलमधून येणारा गॅस मिथेन स्वरुपात असल्याने हवेपेक्षा हलका असतो. पाईपमधून गळती झाली तर तो हवेत मिसळून जातो त्यामुळे स्फोटाची शक्‍यता अत्यंत कमी असते. साहजिकच सिलिंडरपेक्षा पाईपमधून मिळणारा गॅस सुरक्षित ठरतो. 

मेट्रो शहरांत सध्या पाईपद्वारे गॅस घरोघरी मिळतो. पण तेथे स्फोटाच्या दुर्घटना सहसा घडत नाहीत. विनाअनुदानित सिलींडरच्या किंमतीपेक्षा दहा ते चाळीस टक्‍क्‍यांनी स्वस्त गॅस पाईपमधून मिळेल.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेर्ले येथे सध्या गेल कंपनीचे स्टेशन आहे. तेथून एक लाईन सांगली-मिरजेसाठी व दुसरी लाईन सातारा जिल्ह्यासाठी निघेल. जमिनीखाली दिड मीटर खोलीवर पाईप असेल. शून्य गळतीसाठी अत्यंत उच्च प्रतीच्या स्टीलची पाईप वापरली जाईल. प्रत्येक पाचशे मीटरवर गॅस पाईपलाईनची माहिती देणारा इंडिकेटर राहील. शिवाय ठिकठिकाणी सेफ्टी व्हॉल्व स्टेशन्स असतील.

एखाद्या ठिकाणी गळती होऊ लागली तर या स्टेशनद्वारा दोन व्हॉल्व बंद केले जातील. त्यामुळे गॅसचा संपुर्ण प्रवाह थांबेल. दुर्घटना टळेल. पाईपलाईनद्वारे गॅसजोडणी घेण्याची सक्ती नसेल. सांगली, मिरज, आष्टा व इस्लामपुरात या कंपनीची सीएनजी गॅस स्टेशन्स उभी केली जाणार आहेत, तेथे वाहनांसाठीगॅस मिळेल. केंद्र सरकार भविष्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देत असल्याने ही स्टेशन्स महत्वाची असतील. 

जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याचे नियोजन आहे. देशात भूगर्भात प्रचंड प्रमाणात नैसर्गिक वायू आहे. मात्र त्यातील अवघा १० टक्केच वापरला जातो. तो अधिकाधिक वापरला जावा. एल.पी.जी. गॅसवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी पाईपलाईनद्वारे गॅस योजनेचा सरकार पुरस्कार करीत आहे. 

असा आहे प्रकल्प

  •  सांगली व सातारा जिल्ह्यांना भारत गॅस व कोल्हापूर जिल्ह्याला हिंदुस्थान पेट्रोलियमकडून गॅस पुरवठा
  •  हेर्ले (जि.कोल्हापूर ) येथील गेल कंपनीच्या गॅस स्टेशनमधून सांगली-मिरज व सातारा जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र लाईन्स
  •  सांगली, मिरज, आष्टा व इस्लामपूर येथे वाहनांसाठी गॅस स्टेशन्स, पहिल्या टप्प्यात याच शहरांना लाभ
  •  गळती टाळण्यासाठी झेरॉक्‍स स्कॅनिंग केलेल्या उच्च प्रतीच्या स्टील पाईप्स
  •  कनेक्‍शनची सक्ती नाही
  •  पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना लाभ
  •  विनाअनुदानित सिलींडरपेक्षा १० ते ४० टक्‍क्‍यांनी स्वस्त
  •  आष्टा, इस्लामपूर व वाळवा शहरांतील कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण, महापालिका क्षेत्रात अद्याप सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT