पश्चिम महाराष्ट्र

घरच्या घरी कंपोस्ट खत

सचिन देशमुख

कऱ्हाड  ः घरी निर्माण होणारा ओला कचरा घरच्या घरी मुरवला जाऊन त्यातून कंपोस्ट खतनिर्मितीला पालिकेकडून प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मितीला प्लॅस्टिकची डबे देण्यात येत असून, शहरात सुमारे 400 कुटुंबांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे. वाढत्या मागणीमुळे शहरात हजारभर कुटुंबात कंपोस्ट खत निर्मिती सरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. 
देशात स्वच्छतेत अव्वल क्रमांक पटकावलेल्या कऱ्हाड पालिका स्वच्छतेबाबतीत अधिक अग्रेसर होताना दिसत आहे. घरी निर्माण होणारा कचरा पालिकेच्या घंटागाडीत न जाता त्याच्यावर घरच्या घरी प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने शहरात यापूर्वीच अनेकांनी प्रयोग केले आहेत. त्यात कोणी कंपोस्ट खत तर कोणी गांडूळ खत निर्मितीला चालना दिली आहे. मात्र, घरचा कचरा पालिकेच्या घंटागाडीत संकलित न होता त्यावर घरच्या घरी प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने कंपोस्ट खत निर्मितीला चालना दिली आहे. त्यासाठी नागरिकांना डबे व कल्चर देण्यात येत आहे. नागरिकांनी घरातील ओला कचरा साठवून न ठेवता तो कंपोस्ट खत निर्मितीच्या डब्यात टाकून तो कुजवण्याची प्रक्रिया केल्यास व त्याच्या खतनिर्मितीनंतर ते खत परिसरातील झाडांना दिल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी सध्या वाकाण भाग, मार्केट यार्ड, कोल्हापूर नाका आदी ठिकाणी कंपोस्ट खत निर्मितीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे त्यासाठी डबे व कल्चर वाटप केले जात आहे. त्यासाठी संबंधित कुटुंबांना कंपोस्ट खत निर्मितीची आवड असणे आवश्‍यक असल्याचे पाहूनच त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याशिवाय कंपोस्ट खत निर्मिती कशी करायची याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शनही केले जात आहे. सध्या शहरातील सुमारे 400 जणांकडे कंपोस्ट खत निर्मिती सुरू आहे. संबंधितांना पालिकेच्या आरोग्य विभागाचे त्यास सहकार्यही मिळत आहे. संबंधित चार जणांचा ओला कचरा पालिकेच्या घंटागाडीत पडणे बंद झाल्याने संकलित होणाऱ्या कचऱ्याचे काही प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहता सुमारे एक हजारभर कुटुंबात कंपोस्ट खत निर्मिती होण्याची शक्‍यता वर्तवली जात असून, पालिकेने त्यादृष्टीने तयारीही केली आहे. शाळांबरोबरच शहरातील काही शाळांमध्येही कंपोस्ट खत निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पालकर शाळेत पालिकेने कंपोस्ट खताच्या निर्मितीसाठी डबे दिले आहेत. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या डब्यातील खरकटे यासह शाळेच्या परिसरातील झाडांचा पाला, पाचोळा गोळा करून टाकून तो कुजवण्याची प्रक्रिया झाल्यास कंपोस्ट खत निर्मिती होणार आहे. 

""घरी निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर घरच्या घरी प्रक्रिया करण्यासाठी कंपोस्ट खत निर्मितीला शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संबंधितांचा घंटागाडीत पडणारा कचरा बंद होऊन त्यावर घरच्या घरी खत निर्मितीची प्रक्रिया होऊ लागली आहे.'' 

- मारुती काटरे, 
मुकादम, आरोग्य विभाग, 
कऱ्हाड पालिका. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT