Magic figure to reach Sangli municipality 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत महापालिकेत मॅजिक फिगर निश्‍चित गाठणार : आघाडीचा दावा

सकाळवृत्तसेवा

सांगली : भाजपमधील अनेक नाराज नगरसेवक कॉंग्रेस आघाडीच्या संपर्कात आहेत. महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी विजयासाठी आवश्‍यक असणारी सदस्यांची "मॅजिक फिगर' निश्‍चित गाठणार असा दावा विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केला.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांची आज महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त बैठक झाली. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी इच्छुकांशी चर्चा झाली. त्यांची नावे आघाडीच्या नेत्यांना कळवण्यात येणार आहेत. नेते जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी रहाण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

बैठकीस विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर हारुण शिकलगार, मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, संतोष पाटील, विष्णु माने, वर्षा निंबाळकर, वहिदा नायकवडी, मनोज सरगर, फिरोज पठाण, संगीता हारगे, रोहिणी पाटील, प्रकाश मुळके, कांचन कांबळे, नर्गिस सय्यद, आरती वळवडे आदी नगरसेवक उपस्थित होते. 

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते साखळकर आणि राष्ट्रवादीचे गटनेते बागवान म्हणाले,""सत्ताधारी भाजपमध्ये मोठी नाराजी आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीमधील अनेकांना मोठी आश्‍वासने देऊन भाजपमध्ये घेतले. भाजपाच्या चिन्हावर निवडून येऊनही पदाची संधी मिळत नाही. विकास कामे होत नाहीत. म्हणून त्यांचा भ्रमनिरास झाला असून ते नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी उघडपणे आमच्याकडे बोलून दाखवली. आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. पण भाजपमधील नाराज सदस्य आम्हाला मदत करण्यास तयार असतील तर त्याचा फायदा निश्‍चित घेणार.

बहुमताला सहा सदस्य लागणार आहेत. आम्ही मॅजिक फिगर गाठू शकतो. भाजप कोणता उमेदवार देणार त्यावर आमचा उमेदवार निश्‍चित करणार आहे. आमच्यातील काहींनी महापौर-उपमहापौरपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे, असे साखळकर, बागवान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT