पश्चिम महाराष्ट्र

राजकीय पटलावर मुश्रीफांचे नाव नसेल - महाडिक

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर नाव राहणार नाही. ते या निवडणुकीत पराभूत होतील, असे भाकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे केले.

हे भाकीत जनतेचे असून, ते आपल्या तोंडातून बाहेर पडल्याचे सांगत आमदार मुश्रीफ यांच्यावर महाडिक यांनी घणाघाती टीका केली. राजाराम कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाडिक म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेला ज्या कंपनीने हार्डवेअरचा पुरवठा केला, त्या कंपनीने जिल्हा बॅंकेच्या संचालकांसाठी दुबईची सहल काढली. यावेळी दुबईतील एका बारमध्ये जो काही प्रकार झाला, तो लाजिरवाणा होता. या प्रकारावर मला जास्त बोलायचे नाही.’’

जिल्हा बॅंकेने एटीएम बसवण्याचे काम हैदराबाद येथील एका इब्राहिम नावाच्या व्यक्‍तीला दिले आहे. त्या व्यक्‍तीने हैदराबाद येथे एटीएम बघण्यासाठी सर्व संचालकांना निमंत्रण दिले. यावेळी काहींनी हैदराबाद येथील बारमध्येही धिंगाणा घातला. याबाबत आपणाला तोंड उघडायला लावू नये, असा इशारा महाडिक यांनी दिला. हैदराबादला आपण, विनय कोरे आणि पी. एन. पाटील गेलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुलाला विमा एजंट बनवून कमाई
आमदार हसन मुश्रीफ जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या मुलाला एक विमा एजंट केले आहे. या माध्यमातून त्यांनी जिल्हा बॅंकेत होणारी विविध कर्ज प्रकरणे, खरेदी, निविदा या सर्वांचा विमा उतरवून मुलाला कोट्यवधी रुपये मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे, असा आरोप महाडिक यांनी केला. अशाप्रकारे स्वत:च्या मुलाची व्यवस्था बघणारा माणूस सर्वसामान्य माणसाला काय न्याय देणार, असा सवालही त्यांनी केला. 

कागल शाखेतील घोटाळ्याचे काय? 
जिल्हा बॅंकेच्या कागल शाखेत तीन कोटींचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला, हे सांगण्याची गरज नाही. या प्रकरणाचा लवकरच निकाल लागेल आणि या प्रकरणातील कारभारी उघडे पडतील, अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्‍त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT