पश्चिम महाराष्ट्र

कल्याणकारी मंडळासाठी आर्थिक तरतूद करा - वृत्तपत्र विक्रेता संघटना

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - असंघटीत कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी राज्य सरकारने भरीव तरतूद करावी. यासह अन्य अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज एक दिवसाचे ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला. 

राज्यात वृत्तपत्र विक्रेत्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यांच्या जीवनात स्थैर्य येण्यासाठी शासनाने कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी यासाठी वृतपत्र संघटनांनी पाठपुरावा केला. पण शासनाने वृत्तपत्र विक्रेतांसाठी कल्याणकारी मंडळ न करता असंघटीत कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. मात्र अद्याप या मंडळाला आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. यासाठी शासनाच्या विरोधात आज राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सदस्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी "मुख्यमंत्री चले जाव', "अनुदान आमच्या हक्काचे' अशा घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले.

शिवगोंडा खोत, रघूनाथ कांबळे, किरण व्हनगुत्ते, श्रीपती शियेकर, आण्णा गुंडे, शंकर चेचर, सुंरेद्र चौगुले, परशुराम सावंत, सुरेश ब्रम्हपुरे, रमेश जाधव, किसन शहापूरे, बाबासाहेब अवघडे, अंकुश परब यांच्यासह जिल्ह्याच्या सर्व भागातील वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. 

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या -

  • असंघटीत कामगार म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तात्काळ सुरू करा. 
  • महाराष्ट्र राज्य असंघटीत सुरक्षा मंडळाच्या कामकाजासाठी आवश्‍यक त्या सेवा, सुविधा तात्काळ देण्यात येऊन मंडळ प्रत्यक्षात कार्यरत करण्यात यावे. 
  • असंघटीत कामगार, वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव आर्थिक तरतूद करावी. 
  • सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करावे 
  • गटई कामगाराप्रमाणे मोक्‍याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. 
  • अस्तित्व असणारे स्टॉल अतिक्रमणात धरू नयेत. 
  • शासकीय घरकूल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखील कोटा ठेवावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT