अकोले : अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी भाजपचे वैभव पिचड यांचा पराभव केला आहे. तव्बल सातवेळेस मधुकरराव पिचड आमदार हाेते, त्यानंतर वैभव पिचड आमदार हाेते. यावेळेस त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर माजी आमदार वैभव पिचड २ हजार ९७२ तर डॉ. किरण लहामटे ४ हजार २५२ मते पडली. त्यानंतर प्रत्येक फेरीगणिक लहामटे यांना मतांची अघाडी मिळत गेली.
दरम्यान, आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ च्या निवडणुकीत वैभव पिचड पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार तत्पुर्वी वडील माजी मंत्री मधुकर पिचड सातवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. मधुकर पिचड चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.