पश्चिम महाराष्ट्र

सांगली : सुधीर गाडगीळ आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

सांगली - विधानसभा मतदारसंघ तिसऱ्या फेरीत अवघ्या तीन मतांनी आघाडीवर असणारे भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी पाचव्या फेरीत 703 मतांनी आघाडी घेतील आहे. भाजप आणि काँग्रेसमध्येच येथे चुरशीचा सामना रंगला आहे.

पाचवी फेरी अखेर गाडगीळ  यांना 29780 मते मिळाली तर काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना 29077 मते मिळाली. 

चाैथ्या फेरी अखेर - 

सुधीर गाडगीळ (भाजप)-23485
पृथ्वीराज पाटील (काॅंग्रेस)-23433
गाडगीळ 52 मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर - 

सुधीर गाडगीळ (भाजप)-17392
पृथ्वीराज पाटील (काॅंग्रेस)-17389
गाडगीळ 3 मतांनी आघाडीवर

दरम्यान, भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ आणि वीस वर्षांनी पुन्हा दादा घराण्याच्या बाहेर उमेदवारी मिळालेले काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील अशीच थेट दुरंगी लढत सांगलीत आहे. दोन्हीकडे ‘क्‍लीन’ चेहरे आहेत.

गेल्या वेळी रिंगणात असलेले माजी आमदार संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यावेळी गाडगीळांसोबत होते. तेव्हा काँग्रेस, भाजप-सेनेत लढत झाली होती. पवार यांनी ३३ हजार मते घेतली. आता पवार रिंगणात नाहीत. ती मते कोणाच्या पारड्यात याबद्दल कुतूहल आहे. काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी संघर्ष करीत उमेदवारी खेचली आहे. त्यांच्याकडे भाजपऐवढी ताकदीची प्रचार यंत्रणा नाही.

भाजपने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह कर्नाटकचे उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही  सांगलीत आणले. माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर अशी नेत्यांची फौज प्रचारा लावली आहे. सोशल इंजिनिअरिंग सर्व काही ते करीत आहेत. गत कामांचा आढावाही ते ताकदीने मांडले. गाडगीळांचा जोर विकास कामे सांगण्यावर आहे. महापालिका ही यावेळी भाजपच्या ताब्यात आहे. ही जमेची बाजू.

दुसरीकडे पृथ्वीराज यांनी महापुरातील मदत मिळाली नाही हा मुद्दा प्रचारात आक्रमकपणे मांडला. आश्‍वासक कार्यकर्ता म्हणून मतदारांपुढे ओळख नेली. टीकाटिप्पणी टाळत सांगलीत प्रचार होत आहे याला कारण दोन्ही उमेदवारांची मृदू प्रवृत्ती.

वसंतदादा घराण्याचे प्रतिनिधी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे. त्याबरोबर राष्ट्रवादीची शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह टीम रिंगणात होती. महापालिकेतील काँग्रेस आघाडीच्या ३५ नगरसेवकांची फौज त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.  इथे दोन्हीकडे बलाबल आहे. पृथ्वीराज यांनी माजी मुख्यमंत्री सिध्दरामैय्या यांना प्रचारासाठी सांगलीत आणले, मात्र ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट या काँग्रेस नेत्यांना ते सांगलीत आणू शकले नाहीत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावेळी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीची प्रामाणिक साथ ही त्यांची जमेची बाजू आहे. माजी आमदार दिनकर पाटील यांनी बंडखोरी करून आव्हान दिले होते. मात्र या निवडणूकीत ते गाडगीळांच्या सोबत होते ही जमेची बाजू आहे. मात्र या निवडणुकीत बहुजन वादाचा अंडरकरंट जागा करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. याबाबत माजी आमदार संभाजी पवार यांनी बोलके भाष्य केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT