samadhan-autade
samadhan-autade 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : आतापासून आमचं ठरलंय, अपक्ष अर्ज दाखल करणार - समाधान आवताडे

हुकूम मुलाणी

विधानसभा 2019 : मंगळवेढा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून आमचं ठरलंय, असं म्हणत उद्या अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनात बोलताना व्यक्त केले.

गत विधानसभा निवडणुकीत कोणतीही संस्था ताब्यात नसताना शिवसेनेतून 43 हजार इतके मतदार मतदान घेतलेल्या समाधान आवताडे यांनी अलीकडच्या पाच वर्षात दोन साखर कारखाने, सूतगिरणी, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यात आपले राजकीय बस्तान बऱ्यापैकी बसवले असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु, भाजप आणि शिवसेना या युतीमध्येही जागा रयत क्रांती संघटनेला देण्यात आली. त्यामुळे आवताडे यांच्यासमोर एकतर माघार घेणे अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणे हा पर्याय समोर होता. परंतु यावर काय करावे यासाठी विचारविनिमय करण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांची बैठक मंगळवेढ्यात घेतली. या बैठकीत दोन्ही तालुक्यातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यामध्ये उपस्थित मान्यवरांनी भाषणातून तालुक्याच्या विकासासाठी निवडणूक निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह झाला आहे. यावेळी बोलताना अध्यक्ष समाधान पाच वर्षापुर्वी निवडणूक लढवताना मंगळवेढ्यातील समस्या माहीत होत्या, परंतु पंढरपुरातील प्रश्न समस्या माहित नव्हत्या, परंतु या पाच वर्षांमध्ये मी दोन्ही तालुक्यातील प्रश्न प्रश्नाचा अभ्यास केला आहे.

या दोन्ही तालुक्यांमध्ये बेरोजगारीची समस्या वाढत आहे, वाढत्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी व तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून उपस्थितांना ही निवडणूक लढवावी का अशी विचारणा केली असता उपस्थितांनी हात वर केले, हात वर केल्यानंतर मग आपलं आतापासून ठरलंय उद्या अर्ज दाखल करायचं, करण्याचा संदेश कार्यकर्त्यांनी दिला. पाटील रोज माझ्यासाठी आठ तास काम करत आहात, फक्त दोन तास वाढवा आपणाला विजय दूर नाही. उपस्थित सर्वानी  एकत्रित प्रयत्न केल्यानंतर आपल्या अंगावर गुलाल पडण्यास वेळ लागणार नसल्याचा संदेश यावेळी बोलताना दिला. त्यांनीदेखील बोलताना तालुक्याच्या विकासासाठी निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह धरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT