पश्चिम महाराष्ट्र

गड-कोटांची भटकंती प्रेरणादायी चळवळ

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - गड-कोटांची भटकंती ही प्रेरणादायी चळवळ असून, ती महाराष्ट्रातल्या घराघरांत रुजावी, अशी अपेक्षा आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी येथे व्यक्त केली.

मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जंगलातील वाटाड्या भागोजी ढवण, धाकलू बोडेकर, बारकूमामा यांच्यासह रमण कुलकर्णी, अमोल आळवेकर, अमेय जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. सांगवडेकर म्हणाले, ‘‘शिवकाळातील मावळे कसे होते, याचा प्रत्यय भागोजी, धाकलू, बारकूमामा यांच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर येते. ही माणसे जंगलात जन्माला आली आणि जंगलातच राहत आहेत. त्यांना जंगलातील वाटा माहीत आहेत. शिवरायांच्या काळात असेच मावळे स्वराज्यात असावेत.’’

दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके म्हणाले, ‘‘माझ्यासमवेत गडकोट भटकंती करणाऱ्या सहकाऱ्यांचे कौतुक मला पाहायचे आहे. त्यासाठीच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.’’

भागोजी ढवण यांनी जंगल म्हणजे एक जीवन आहे. जंगलात नेमके काय घडते, हे आम्ही अनुभवत असतो, तर धाकलू बोडेकर यांनी जंगलात वाट चुकलेल्या माणसाला वाट दाखवण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट केले. 

बारकूमामा यांनी जंगली कोंबड्याच्या ओरडण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. श्री. कुलकर्णी, केदार मुनीश्वर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्लाईड शोद्वारे गडकोटांच्या मोहिमा दाखवून भविष्यातील उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली.

डॉ. विश्वनाथ भोसले, प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर, नीलराजे बावडेकर, राजू परुळेकर, पुंडलिक पोवाळकर, अमित बोकील, प्रसाद जोशी उपस्थित होते. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. सागर आफळे यांनी प्रास्ताविक केले. रितेश मोरे याने आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT