man versus wild story sangli district
man versus wild story sangli district 
पश्चिम महाराष्ट्र

"मॅन वर्सेस वाईल्ड'ला अल्पविराम 

शैलेश पेटकर

सांगली - कोरोना संकटात माणूस घरात कैद झाला, मात्र जंगलात, नदीत, डोंगरावर, उद्यानात वावरणाऱ्या प्राणी विश्‍वावर, वन्य जीवांवर त्याचा नेमका काय परिणाम झाला, याचा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवादातून आढावा घेतला. त्यात तरस, लांडगे, कोल्हे, कोकडांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गवर असल्याची माहिती समोर आली. दुसरीकडे कृष्णाकाठी मगर विरुद्ध माणूस हा संघर्ष या काळात थांबला आणि मगरींचा प्रजनन काळ सुखाने गेल्याचे निष्पन्न झाले. वन्यजीवांचे चाललेय काय, याचा हा आढावा. 

या प्राण्यांचे अस्तित्व धोक्‍यात 
जिल्ह्यातील मणेराजुरी, कुकटोळी, तासगाव, विटा, सलगरे या भागातील माळरानात वास्तव्य असणाऱ्या तरस, लांडगे, कोल्हे, कोकड यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. या भागात सुरू असणारी रस्त्यांची कामे, माणसाचां वाढता हस्तक्षेप ही कारणे आहेत. भक्ष्य मिळविण्यासाठी त्यांना वीस तीस किलोमीटर भटकावे लागते, असे ऍनिमल राहतचे किरण नाईक यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात भरकटलेला एक तरस सापडला. त्या तरसावर हल्ला झाला होते. त्याने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली, मात्र निष्फळ. त्यांची शिकारही वाढू लागली आहे. त्यामुळे अन्नसाखळी विस्कळीत झाली असून अस्तित्व धोक्‍यात आहे. 

मगरींचे सुखाचे दिवस 
कृष्णा, वारणा आणि उपनद्यांत मगरींनी प्रजनन काळात अनेक हल्ले केल्याचा इतिहास आहे. आतापर्यंतच्या 22 गंभीर हल्ल्यांपैकी 18 हल्ले हे या काळातील आहेत. यंदा माणूस घरात कैद असल्याने मगर विरुद्ध माणूस संघर्ष टळला आणि मगरींनी अतिशय आनंदाने सुखात दिवस घालवते, असे प्राणी मित्रांनी निरीक्षण नोंदवले आहे. आता मात्र पुन्हा एकदा माणसाचा नदीकाठचा वावर वाढला आहे. मगरीची छोटी पिले नदीकाठी आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी मगर आक्रमक होऊ शकते, त्यामुळे सावध राहा, असे सल्लाही त्यांनी दिला आहे. 
 

बिबट्या जंगलाबाहेर 
चांदोली राष्ट्रीय उद्यानात सुमारे 35 बिबट्या असल्याची नोंद आहे. काही बिबटे अन्नाच्या शोधत बाहेर पडतात. त्यांचा वावर चांदोलीपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरापर्यंत नोंदवला गेलाय. पुरेशे अन्न मिळत नसल्याने ते अन्नाच्या शोधात रस्ता चुकत आहेत. अनेकदा त्यांनी भटक्‍या कुत्र्यांवर हल्ला केला आहे. मांगरूळ, बिळाशी, वाकुर्डे, येळापूर, कुसाईवाडी, मांगले, मिरखेवाडी, बेर्डेवाडी, कांदे, शिंगटेवाडी परिसरातील पाळीव प्राण्यांना भक्ष्य केलेय. गेल्या महिन्यांत चरण येथील राजू कोंडीबा शिंगमोडे शेतात मका काढण्यासाठी गेला असता बिबट्याने हल्ला केला होता. शिराळ्यासह वाळवा तालुक्‍यात 16 वर्षात 9 बिबट्याचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी उद्यानबाहेर सात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. 

सागरेश्‍वरमधून लवकरच चांदोलीत हरणे 
सागरेश्‍वर अभयारण्यातून लवकरच काही हरिण, सांबर हे चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात सोडली जाणार आहेत. ती मार्चमध्येच सोडण्याचे नियोजन होते, मात्र कोरोना संकट काळात ते लांबणीवर पडले. आता पावसाळ्यानंतर हा कार्यक्रम होईल. येथे हरणांची संख्या आता वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांत हरणांचे कळप वाढल्याचे सहायक वनसंरक्षक अनिल जेरे यांनी सांगितले. 

शिकार वाढल्याचा अहवाल 
वन्यजीव तस्करी आणि शिकारीत वाढ झाल्याची नोंद "ट्रॅफिक' या संस्थेच्या अहवालात नोंदवले गेले आहे. मांस भक्षण आणि शिकारीसाठी हे प्रकार होत आहेत, असे लक्षात आले आहे. लॉकडाउन काळात हे प्रकार वाढले आहेत. यात सांगली जिल्ह्यातील काही प्रकार आहेत का?, याची तपासणी वन्य विभागाने तातडीने करण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

SCROLL FOR NEXT