Crops.jpg
Crops.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कीडरोगाचे मोबाईलवरूनच व्यवस्थापन ; कृषी विभागाचा फंडा

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : राज्यातील दोन कोटी 25 लाख 15 हजार शेतकऱ्यांना एप्रिल 2018 पासून आतापर्यंत कीड नियंत्रणाचा सल्ला मोबाईलवरूनच देण्यात आला आहे. कीडरोगाने त्रस्त असलेल्या पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करणे अपेक्षित होते. परंतु, कृषी विभागाकडून एसएमएसद्वारेच सल्ला दिला. तरीही कीडरोग नियंत्रणात आल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला आहे. 

''पाण्याअभावी खरीप वाया गेला, आता रब्बीपुढेही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. दुसरीकडे मका, ऊस, भात आणि कापूस पिकांसह अन्य पिकांना कीडरोगाचा फटका बसला आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे बहुतांशी क्षेत्रावरील पिके वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून आता शासनाकडून ठोस भरपाई मिळावी, '' अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यासाठी गावोगावी मेळावे घेणे अपेक्षित असताना मात्र बहुतांशी गावांमध्ये तसे प्रयोग झालेच नाहीत. 

- राज्यातील सुमारे 20.26 लाख हेक्‍टरवरील पिकांना किडींचा विळखा 
- 14.41 लाख हेक्‍टरवरील उसाला हुमणीचा फटका 
- 142 गावांमधील विविध पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 
- रस शोषणाऱ्या व शेंदरी बोंड अळीचा कापसाला फटका 
- भात पिकावर पिवळा खोडकिडा, तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव 
- मका पिकाला फॉल आर्मिवर्म किडीचा विळखा 
- तुरीवर पाने खाणारी, पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव 
- कीडरोग नियंत्रणासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च 


''उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांमार्फत सोलापुरातील सव्वालाख शेतकऱ्यांना कीडरोग नियंत्रणाचे एसएमएस पाठविण्यात आले आहेत. तसेच कीडरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना कामगंध सापळेही वाटप केले आहेत.'' 
- रवींद्र माने, सहसंचालक, कृषी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT