पश्चिम महाराष्ट्र

"माणदेश' व्हावा जिल्हा अन्‌ "हे' व्हावे केंद्र

सकाळवृत्तसेवा

नागेश गायकवाड

आटपाडी ः समाज माध्यमात राज्यात नवीन जिल्हा, तालुका निर्मितीची चर्चा सुरू आहे. माणदेश जिल्ह्याचे नाव आघाडीवर आहे. माणदेशासाठी आटपाडी हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून निश्‍चित करावे, अशी मागणी होत आहे.
राज्यात नवीन 22 जिल्हे, 49 तालुके करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदारपणे सुरू आहे. साताराचे विभाजन करून नवीन माणदेश जिल्ह्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. माणदेश जिल्ह्याचा कोणत्या तालुक्‍यांचा समावेश आहे हे समजू शकले नाही.


सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहांकाळ सातारातील माण, खटाव, सोलापूरातील सांगोला, मंगळवेढा या तालुक्‍यांची नावे चर्चेत आहेत. माणदेश जिल्हा निर्माण करणे हे भौगोलिक सलगतेच्या दृष्टीने योग्य ठरेल, असे काही तज्ञांचे मत आहे. नवीन नांदेड जिल्हा करताना सर्वांच्या सोयीने आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तालुका जिल्हा म्हणून करावा, असाही सूर उमटत आहे. प्रस्तावित माणदेश जिल्ह्यात आटपाडी हे मध्यवर्ती ठिकाण आणि सर्वांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार असल्यामुळे आटपाडी नव्या माणदेश जिल्ह्याचे ठिकाण करावे, असा तालुक्‍यातून सूर उमटत आहे. त्यात समावेश होणारे सर्वच तालुके 40 ते 70 किलोमीटर अंतरात येतात.


आष्टा, शिगाव, आटपाडी, दिघंची हा राजमार्ग, विझोर (अकलुज), आटपाडी, मिरज मार्गे हेरवाड (कोल्हापूर) राजमार्ग आणि मल्हारपेठ पंढरपूर राजमार्ग हे तीन राजमार्ग रस्ते आटपाडीतून जातात.


पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वात मोठा शेळ्या-मेंढ्या, जनावरांचा बाजार आटपाडीत भरतो. बाजारानिमित्त परराज्यातील व्यापारी मोठया संख्येने आटपाडीत येतात. सर्वोतम खिलार जनावरांचे आगर आटपाडी तालुका हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण झाल्यास जनावरांच्या बाजारास, कृषीपूरक मेळावे, महोत्सव, प्रदर्शनांना वाव मिळणार आहे.

दर्जेदार डाळिंब निर्मिती, व्यावसायिक


गुणवंत, प्रज्ञावंतांची खाण असलेल्या माणदेशातील विविध क्षेत्रात देश विदेशात नाव करणाऱ्या सुपुत्रांची संख्या मोठी आहे. अनेक मोठे साहित्यिक आटपाडी तालुक्‍यातून तयार झाले. आटपाडी खुले कारागृह, टेंभू योजनेत झाली आहे. आता पाणी टंचाई भासणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात आटपाडी जिल्हा करावा असा सूर उमटू लागला.

""माणदेश जिल्ह्यात आटपाडी तालुका मध्यवर्ती करावा. त्यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समिती, मार्केट कमिटी, इतर सर्व प्रकारच्या संस्था, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या मागणीला समर्थन देत आवाज उठवावा.


-सादिक खाटीक,
सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: येरवड्यात भरधाव टेम्पोचा थरार! फुटपाथवर घुसून अनेक वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

कार नाल्यात कोसळली, तो वाचवा वाचवा ओरडत होता; वडिलांच्या डोळ्यादेखत २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाचा बुडून मृत्यू

HDFC ग्राहकांसाठी रेड अलर्ट! जर 'ही' 1 चूक कराल तर डायरेक्ट बँक अकाऊंट होईल रिकामं; आजवरच्या सर्वांत मोठ्या फ्रॉडबद्दल दिली माहिती

Latest Marathi Live Update : पुणे येरवड्यात भरधाव टेम्पोचा कहर; अनेक वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

Bike Trip: बाइक ट्रिप कुठे करावी अन् कुठे नाही? प्रवास करण्यापूर्वी 'या' टिप्स ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT