soplapur city harshe
soplapur city harshe 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर सिटी बसच्या 40 मार्गांचा "रुट मॅप' 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर  : महापालिकेच्या परिवहन विभागानेही हळूहळू कात टाकण्यास सुरवात केली आहे. स्मार्ट सिटीला साजेल अशा यंत्रणा उभारण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील 40 मार्गांचे "रुट मॅप' तयार करण्यात येत आहे. त्यामुळे कोणती बस कोणत्या मार्गाने जाणार हे संगणकावर पाहता येणे शक्‍य होणार आहे. 

महापालिकेच्या संगणक विभागातील तज्ज्ञ नागनाथ पदमगोंडा हे या संदर्भातील ऍप तयार करीत आहेत. त्यासंदर्भात शहराच्या मध्यवर्ती भागासह हद्दवाढीतील 40 बसथांबे निश्‍चित करण्यात आले आहेत. "रुट मॅप' निश्‍चित केल्यानंतर कोणत्या मार्गाची बस कोणत्या ठिकाणाहून जाणार ते संकेतस्थळावर पाहता येणार आहे. 

कोंतम चौक ते कुमठा हा मार्ग पाहिला तर, कोंतम चौक-मधला मारुती-बाळीवेस-पांजरपोळ चौक- मेकॅनिकी चौक-सरस्वती चौक-लकी चौक-चार हुतात्मा पुतळा-डॉ. आंबेडकर चौक-डफरीन चौक-हरिभाई देवकरण प्रशाला-रंगभवन-सात रस्ता ते जुना होटगी नाका-महावीर चौक ते आसरा चौक ते विमानतळ हा संपूर्ण मार्ग ठळक रेषेने दाखविण्यात येणार आहे. थांबे असलेल्या ठिकाणी थांब्याचे नाव व बसचे चित्र असणार आहे. 

घरबसल्या होणार मार्गाची माहिती 
या ऍपमुळे कोणती बस कोणत्या मार्गाने जाणार आहे, त्याची माहिती जागेवर मिळणार आहे. भविष्यात एखाद्या मार्गावरील बस सध्या कोणत्या ठिकाणी आहे हे "ऑन दी स्पॉट' कळण्यासाठीचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे  प्रवाशाला, त्याला अपेक्षित असलेली बस कोणत्या थांब्यावर आहे, ते जागेवर कळण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT