Faltan
Faltan 
पश्चिम महाराष्ट्र

पत्रकार करणार फलटणमध्ये एस. टी. प्रशासनाविरोधात उपोषण

संदिप कदम

फलटण : सततच्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या फलटण एस. टी. आगाराकडून अजूनही प्रवाशांसाठी ठोस भूमिका मंत्री दिवाकर रावते घेत नसल्याने फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार उद्या सकाळी १० वाजता उपोषणास बसणार असून एस. टी. प्रवाशांना योग्य सेवा सुविधा मिळण्याची हमी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे पत्रकारांच्यावतीने सांगण्यात आले आहे. एस. टी. महामंडळ फलटण आगाराच्या अनागोंदी कारभारामुळे फलटण तालुक्यातील सर्व विद्यार्थी, पालक, जेष्ठ नागरिक, महिला प्रवाशांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत असून यांच्या या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित राहून सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पत्रकारांच्यावतीने करण्यात आले आहे.

वेळेत एसटी बस न सुटणे, प्रवासी, जेष्ठ नागरिक, विद्यार्धी, महिला यांच्याशी उद्धटपणे बोलणे, धोकादायक एसटी बसेस मधून प्रवासी वाहतूक करणे, एसटी बसेसची साफसफाई न करणे, एसटी विध्यार्थी पास देणेसाठी दिरंगाई करणे या व ईतर सर्व एसटी समस्येबाबत अनेकवेळा फलटण तालुक्यातील जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, विविध पक्ष व संघटना यांनी यापूर्वी निवेदन व आंदोलन करुनही कोणतीच उपाययोजना सातारा विभागाचे अधिकारी करीत नसल्याने या उपोषणास सर्वांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाबाबत तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांना निवेदन देण्यात आले असून या अधिकाऱ्यांनी एस. टी. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत पूर्व कल्पना दिली आहे. 

फलटण एस. टी. आगाराचा तोटा कमी व्हावा, सर्व बस फेऱ्या सुरळीत जाव्यात यासाठी सर्व घटकांनी एस. टी. ला सहकार्य केले आहे परंतू हे सर्व एकतर्फी सुरु असून एस. टी. प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने दिवसेंदिवस प्रवाशांच्या अडचणी वाढत असल्यानेच आंदोलनाची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT