पश्चिम महाराष्ट्र

गॅसच्या स्फोटामुळे कऱ्हाड शहर हादरले 

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटाने आज पहाटे सहाच्या सुमारास कऱ्हाड शहर हादरले. येथील चावडी चौकातील धोपाटे वाड्यानजीकच्या स्वप्नील रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. त्यात हॉटेलसह शेजारच्या सहा दुकानांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाचा आवाज निम्म्या शहराला व्यापून गेला. शहरातील वीजपुरवठाही बंद झाला. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस व बॉंब शोधक पथक त्वरित दाखल झाले. मात्र, तेथे गॅस व्यतिरिक्त कोणतेही स्फोटक आढळले नाही. 

या कॉम्प्लेक्‍समध्ये दुकाने व काही शोरूम आहेत. स्वप्नील रेस्टॉरंटमधील गॅसच्या पाइपमधून गळती झाली. रात्रभर त्यामधून गॅस बाहेर आला. साठलेल्या गॅसचा हॉटेलमधील दिव्याशी संबंध येऊन स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतक्‍या जोराची होती, की हॉटेलचे पूर्ण नुकसान झाले. शटर सुमारे बारा फूट लांब उडून पडले होते. 

हॉटेलबरोबरच शेजारील सहा दुकानांचे शटर, फर्निचर, काचांचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील मोबाईल शोरूमच्या काचा फुटल्या होत्या. शेजारच्या दुकानाचे शटर तुटून त्याच्या शोरूमचे नुकसान झाले होते. वरच्या मजल्यावरील कपड्याच्या शोरूमच्याही काचा फुटल्या होत्या. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या रेलिंगलाही त्याचा दणका बसला आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत मदतकार्य राबवले. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. 

बॉंबशोधक पथक पाचारण 
स्फोटाबाबत काही लोकांनी शंका घेतल्याने त्वरित बॉंबशोधक पथक बोलविण्यात आले. मात्र, एलपीजी गॅसव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा स्फोटक अथवा अन्य संशयास्पद वस्तू आढळली नाही. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व अन्य नगरसेवकांनीही भेट देऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT