Representational Image
Representational Image 
पश्चिम महाराष्ट्र

दिवाळीतही बाजारपेठेत मंदी; ऑनलाईन खरेदीमुळे व्यापार्‍यांना फटका

दावल इनामदार

ब्रह्मपुरी : मंगळवेढा व ग्रामीण भागातील बाजारपेठेत एकूण वातावरण गेल्या काही दिवसांपासून ‘थंड’ असल्याचे दिसत असले तरी दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी कमी प्रमाणात खरेदी केली. नेहमीसारखी गर्दी  नसली तरी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. धनत्रयोदशीला व पाडव्यालाही थोड्या प्रमाणात सोने खरेदी झाली.

मुहूर्तावर खरेदी करण्यास ग्रामीण भागात अजूनही महत्त्व असून त्यामधे ग्राहकांनी ऑनलाइन खरेदीला मोठी पसंती दिली आहे. तितक्याच चांगल्या ऑफर्स ऑनलाइन मिळत असल्याने बाजारात एरवी दिसणारी गर्दी दिसत नसली तरी दिवाळीच्या मुहुर्तावर ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी व शो-रुममध्ये जाऊन खरेदी करण्यात आली. यात ग्राहकांना अनेक चांगल्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या.

मुख्यत: बाजारपेठेत एलईडी टीव्ही, फ्रीज, वाॅशिंग मशीन, दुचाकी गाड्यांमधे हिरो, होंडा, सुझूकी, बजाज आदी शोरूममध्ये शून्य टक्के दराने ऑफर्स असल्यामुळे खरेदीची धूम जाणवत होती.

सध्या बाजारात असलेले १२ इंची एलईडी टीव्ही, ३२ इंची टीव्ही, रेफ्रीजरेटर यांना ५ टक्के ते २० टक्के पर्यन्तची कॅश डिस्काऊंटची  सूट असून आकर्षक भेटवस्तू दिल्या जात आहेत .दुचाकी गाड्यामधे भरगोस सूट व ऑफर्स  देऊनही मंदी जाणवत होती. ऑनलाइन बाजारामुळे स्थानिक इलोक्ट्रोनिक दुकानामधे मंदी जाणवत होती. सध्या पाऊस पाणी भरपूर असला तरी काही साखर कारखान्याने दिवाळीमध्ये बिले न दिल्यामुळे शेतकरी वर्गामधे नाराजी जाणवत होती. 

मंगळवेढा शहरामध्ये दिवाळीच्या दोन-तीन दिवसांमध्ये सर्वच कपड्यांच्या शोरुममध्ये तुरळक गर्दी दिसून आली. गेल्या वर्षी नोटबंदीचा फटका व यावर्षी जीएसटी लागू झाल्यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. ग्राहक वर्गांना जीएसटीमुळे अधिक भुर्दंड बसत असल्यामुळे खरेदी करण्याचे प्रमाण घटले गेले, असे व्यावसायिकांनी व्यक्त केले.

दिवाळीत घरी गोडधोड करण्याची पद्धत कमी झाली असली तरी मिठाईवर ताव मारण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यातच बाजारात अनेक प्रकारच्या कमी अधिक गोड मिठाई उपलब्ध असल्याने ग्राहकांकडून याला पसंती देण्यात येत होती .

'यावर्षी पाऊस झाला असला तरी ग्राहक हे ऑनलाइन खरेदीला महत्त्व देत आहे तरीसुद्धा चांगल्या प्रकारची विक्री झाली असून जीएसटी फटक्याची नाराजी जाणवत होती.'
- जुनेद शेख, विक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT