पश्चिम महाराष्ट्र

मुद्राच्या कर्जवाटपात सोलापूर राज्यात नंबरवन 

प्रमोद बोडके

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना उद्योगासाठी सुलभपणे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना जाहीर केली. या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या कृती आराखड्याच्या माध्यमातून आज सोलापूर जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 97 हजार 958 जणांना या योजनेतून कर्जवाटप झाले आहे. सर्वाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात सोलापूर जिल्हा क्रमांक एकवर आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मुद्रा योजनेसाठी बॅंका व ग्राहक यांच्यात समन्वय घडवून आणला. सोलापूर जिल्ह्यासाठी मुद्रा योजनेचे 362 कोटी रुपये वाटप करण्याचे उद्दिष्ठ होते. शिशू, किशोर व तरुण गटातील 1 लाख 97 हजार 958 लाभार्थ्यांना 807 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 786 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या 217 टक्के वाटप एकट्या सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. 

महाराष्ट्रात आतापर्यंत 26 लाख 10 हजार 143 लाभार्थ्यांना 14 हजार 622 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 14 हजार 235 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. राज्यात सर्वांत कमी वाटप पालघर 22 टक्के, चंद्रपूर 53 टक्के, परभणी 61 टक्के, बीडमध्ये 62 टक्के झाले आहे. 

आकडे बोलतात... 
टॉप फाइव्ह जिल्हे आणि त्यांचे लाभार्थी 
सोलापूर : 1 लाख 97 हजार 958 
पुणे : 1 लाख 93 हजार 345 
नागपूर : 1 लाख 73 हजार 155 
जळगाव : 1 लाख 65 हजार 258 
कोल्हापूर : 1 लाख 58 हजार 962 

असा आहे डॉ. भोसलेंचा मुद्रा पॅटर्न 
वार्षिक पतपुरवठा आराखड्यात बॅंकांना पीक कर्ज, मुद्रा योजना यासह इतर योजनांचे उद्दिष्ट दिले जाते. बॅंकांबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी ग्राहक व बॅंक यांच्यातील सुसंवाद वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर मेळावे व विशेष लोकशाही दिना घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याद्वारे समस्यांचे निराकरण करण्यात आले. बॅंकांना विश्‍वास व युवकांना प्रोत्साहन या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT